3000 अमेरिकन हिरे बाळगणाऱ्यास पुणे विमानतळावर अटक

संयुक्त अरब अमिराती (UAE) हून पुण्याला आलेल्या प्रवाशाकडे तब्बल तीन हजार अमेरिकन हिरे सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रवासी शारजाहून पुणे विमानतळावर आला होता. 75 कॅरेटच्या या हिऱ्यांची एकूण किंमत 48 लाख 66 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावर ही कारवाई केली. तीन हजार अमेरिकन हिरे बाळगणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

17 मार्च रोजी शारजाहून येणाऱ्या एका विमानात हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती पुणे कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला मिळाली होती. त्यानुसार पुणे कस्टम विभागाने केलेल्या एका प्रवाशाला अडवत त्याची चौकशी केली. चौकशी करत असतानाच त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे सुमारे तीन हजार अमेरिकन डायमंड्स सापडले.

हे हिरे प्रवाशाच्या सामानात पॅक केलेल्या ट्राउझर्सच्या पाऊचमध्ये लपवून ठेवले होते. 75 कॅरेटच्या या हिऱ्यांची एकूण किंमत 48 लाख 66 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आहे. भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न केलेले हे हिरे सीमा शुल्क कायदा 1962 नुसार जप्त करण्यात आले आहेत. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.