काश्मीर फाइल्स वादावर इस्रायलच्या भूमिकेमागे आहे मोठं कारण; म्हणून 24 तासांत माफीनामा
इस्त्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’वर केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे. लॅपिडने या चित्रपटाचे वर्णन ‘प्रोपोगंडा’ आणि ‘अश्लील’ असे केले होते. यानंतर देशभरात सोशल मीडियावर दोन गट पाहायला मिळाले. एकीकडे लॅपिड यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली तर दुसरीकडे काही लोक या ज्युरीची पाठराखणही करताना दिसले. मात्र, या प्रकरणी इस्त्रायलने नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन म्हणाले की, लॅपिडला लाज वाटली पाहिजे. त्याचवेळी इस्रायलच्या वाणिज्य दूतावासानेही अनुपम खेर यांना फोन करून माफी मागितली. मात्र, यामागे वेगळच कारण असल्याचं बोललं जातंय.गोव्यात 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) सुरू आहे. इस्त्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ संदर्भात हे विधान केले आहे. तो म्हणाला, ‘द कश्मीर फाइल्स पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला आणि अस्वस्थ झालो. आम्हाला हा चित्रपट प्रोपोगंडा आणि कुरूप वाटला.
कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झाल्यास जबाबदार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण
केंद्र सरकारने कोरोना लसीकरणामुळे झालेल्या कथित मृत्यूंबाबत कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले आहे की, मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संपूर्ण सहानुभूती आहे. मात्र, लसीच्या कोणत्याही प्रतिकूल परिणामासाठी तिला जबाबदार धरता येणार नाही.
हे प्रकरण कोरोना लसीकरणामुळे कथितरित्या दोन तरुणींच्या मृत्यूसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या वर्षी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित आहे. प्रतिज्ञापत्रासह दाखल केलेल्या उत्तरात केंद्राने म्हटले आहे की, लसीमुळे मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयात खटला दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली जाऊ शकते. दोन मुलींच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून हे प्रतिज्ञापत्र केंद्राकडून देण्यात आले. कोरोनाच्या लसीकरणानंतर गेल्या वर्षी दोन तरुणींचा मृत्यू झाला होता.
अपमान झाल्यासारखं वाटलं; शूज काढून उभा केल्यानं ग्रँडमास्टर नारायणन भडकला
भारताचा ग्रँडमास्टर एस एल नारायणन हा जर्मनीत सोमवारी बुंडेस्लिगा चेस लीगमध्ये सहभागी झाला होता. यावेळी आपल्याला जी वागणूक मिळाली त्यामुळे अपमानास्पद वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोशल मीडियावरून नारायणन याने ट्विट करत म्हटलं की, ‘मला अपमान झाल्यासारखं वाटतंय. मी जर शांत राहिलो तर स्वत:सह इतर खेळाडूंना न्याय मिळणार नाही ज्यांना असाच अनुभव आला.’ बुंडेस्लिगा चेस लीगवेळी मेटल डिटेक्टर तपासणीवेळी जिथे बुद्धीबळ स्पर्धा सुरू होती तेव्हा पायातले शूज काढून उभा राहयला लावलं. तपासणीवेळी बीपचा आवाज आल्यान नारायणनला शूज आणि पायमोजे काढायला लागले.
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार?
महाराष्ट्रात अलीकडेच सत्तांतर घडलं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही काहीवेळा भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती.आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीबाबत मोठा खुलासा केला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आपण स्वतंत्र लढणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारतीय लष्कराला मिळाला ‘अर्जुन’, पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनची करणार ‘शिकार’
भारत-पाकिस्तान सीमाभागात सातत्याने ड्रोन हल्ले करण्यात येतात. तसेच, ड्रोनचा वापर करुन ड्रग्स, बंदूका आणि पैसे पाकिस्तानमधून भारतात येत असल्याची अनेक प्रकरणे नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता हे ड्रोनची शिकार करण्यासाठी भारतीय लष्कराकडून पक्षाचा वापर करण्यात येणार आहे. हा पक्षी म्हणजे घार आहे.उत्तराखंड येथील औलीमध्ये भारत आणि अमेरिकेच्या लष्करात संयुक्त प्रशिक्षण अभ्यास सुरु आहे. यावेळी शत्रूचे ड्रोन ठिकाण ओळखणे आणि ते नष्ट करण्यासाठी घार आणि कुत्र्याचा वापर करण्यात येत असल्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यातील घारीचे नाव ‘अर्जुन’ आहे. ही घार हवेतच ड्रोनची शिकार करून नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर, कुत्रा ड्रोनचा आवाज ऐकून भारतीय लष्कराला सतर्क करण्याचे काम करणार आहे.
SD Social Media
9850 60 3590