अभिनेत्री मुक्ता बर्वेचा झी मराठी गौरव पुरस्काराने सन्मान

मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली 21 वर्ष कटिबद्ध आहे. मराठी नाटक चित्रपटांसाठीच ‘झी मराठी’चं हे समृद्ध नातं सन 2000 पासून सुरु झालं होतं. या समृद्ध नात्याचा गौरव करण्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी दिमाखदारपणे संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 21 वर्षातल्या, 21 महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या महागौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान पटकावला अभिनेत्री मुक्ता बर्वेने. जोगवा या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या हस्ते मिळाला.

पुरस्कार मिळाल्यानंतर मुक्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “झी महागौरवचा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप छान वाटलं. तो दिवसच खूप छान होता. मला ती संकल्पनाच खूप आवडली. झी गौरवच एकविसावं वर्ष. माझ्या करियरला आता 20 वर्ष झालं. तसेच करिष्मा कपूरच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा पण आनंद आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर मी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यावर फॅन्सनी खूप कौतुक केलं. काहींनी कौतुक करताना ‘निर्विवाद होतं’ अशी कमेंट देखील केली. पण मला स्वतःला निर्विवाद वाटत नाही. कारण अनेक अभिनेत्रींनी उत्तम कामं केली. 21 वर्षात ज्या अभिनेत्रींना पुरस्कार मिळाले त्या उत्तमच आहेत. त्यामुळे माझी पुरस्कारासाठी निवड होणं निर्विवाद होतं असं मी म्हणणार नाही पण माझी निवड झाली याचा मला प्रचंड आनंद आहे.”

यंदाच्या महागौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान अभिनेत्री मुक्ता बर्वेने पटकावला. जोगवा या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरच्या हस्ते मिळाला. मुक्ता मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेला चेहरा आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतीच तिची ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका सोनी मराठीवर येऊन गेली. याशिवाय तिचा ‘पुणे-मुंबई-पुणे’ हा सिनेमाही खूप लोकप्रिय झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.