भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या जयंतीच्या निमित्ताने 125 रुपयांचे नाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 125 रुपयांचे नाणे जारी केले आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (ISKCON)चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने 125 रुपयांचे विशेष स्मृत्यर्थ नाणे जारी करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्मृत्यर्थ नाणे जारी केले. त्यावेळी मोदी यांनी म्हटले की, स्वामी प्रभुपाद एक अलौकिक कृष्णभक्त तसेच महान देशभक्तही होते.

स्वामीजींनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातही संघर्ष केला होता. असहयोग आंदोलनाच्या समर्थनार्थ स्कॉटिश कॉलेजमधून आपला डिप्लोमा रद्द केला होता.

स्वामी प्रभुपाद यांनी जगातील 100 हून अधिक देशांमध्ये मंदिरांची स्थापना केली. जगाला भक्ती योगाचा मार्ग दाखवणारा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्थापन केलेल्या ISKCONला ‘हरे कृष्ण आंदोलन’ च्या रुपात मानले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले ISKCON मंदिरने गुरूकुल भारतीय संस्कृतील जिवंत ठेवले आहे. इस्कॉनने जगाला पटवून दिले की भारताची आस्थेचा अर्थ उमंग आणि उल्लास आणि मानवतेवर विश्वास ठेवणे होय.

ISKCONने श्रीमद्भगवद् गीता आणि अन्य वैदिक साहित्यांचे 89 भाषांमध्ये अनुवाद केले आहेत. ISKCON जगभरातील देशांमध्ये विविध भाषांमध्ये वैदिक साहित्याच्या प्रसारामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.