करवंदाची लागवड करत मुक्ताईनगरचे शेतकरी मंगेश पाटील मालामाल

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील मंगेश जयवंत पाटील या शेतकऱ्याने दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही 12 एकर शेतीवर करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. या करवंदांना दिल्ली आणि कोलकाता येथील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे दुष्काळ असूनही मंगेश पाटील मालामाल झाले आहेत.

मंगेश पाटील हे जळगाव जिल्ह्यात करवंदाची लागवड करणारे एकमेव शेतकरी आहेत. परिसरातील 200 मजूर देखील या शेतात नेहमी राबत असतात. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती पावसाळाही कमी प्रमाणात होत असल्यामुळे रब्बी, खरिपाचे पिकांनाही पाहिजे तसे उत्पन्न सध्या येत नाही. अनेक शेतकरी सध्या हवालदिल आहेत. अशातच मंगेश पाटील यांनी करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यांसमोर देखील एक नवीन आशा निर्माण झाली आहे.

इतर शेतकऱ्यांनी करवंदाची लागवड करावी असे आवाहनही मंगेश पाटील यांनी केले आहे. मंगेश पाटील यांनी 8 हजार करवंदाची वृक्ष लागवड केली आहे. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव यावर येत नसून द्राक्षासारखं पिक आपण घेऊ शकतो इतर शेतकऱ्यांनी याकडे वळावे, असा सल्ला मंगेश पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.