सचिन वाझेची 2 दिवसांची, तर सुनील मानेची 5 दिवसांची कोठडी हवी

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि सुनील माने यांची पुन्हा चौकशी करावी लागणार आहे. म्हणूनच एनआयएने विशेष न्यायालयाकडून दोघांची कोठडी मागितली आहे. तर सचिन वाझेची ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केल्याचा दावा, वाझेच्या वकिलांनी कोर्टात केला.

शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान एनआयएने न्यायालयाला सांगितले की त्यांना सचिन वाझेची 2 दिवसांची, तर सुनील मानेची 5 दिवसांची कोठडी हवी आहे. दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर एनआयएने या प्रकरणात 5 आरोपींना अटक केली होती.

एनआयएला त्या पाच आरोपींकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे, ज्यावर एनआयएने तपास सुरु केला आहे. त्यांना आता काही संशयितांची माहिती मिळाली आहे, ज्याच्याशी संबंधित त्यांना चौकशी करायची आहे आणि अधिक माहिती वाझे आणि माने यांच्याकडून घ्यायची आहे. या प्रकरणात आता सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. जेव्हा दोन्ही पक्ष न्यायालयात आपले मुद्दे मांडतील आणि त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल.

दरम्यान सचिन वाझेची ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज आहे, असा रिपोर्ट जेजे रुग्णालयातर्फे देण्यात आला आहे. वाझेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मागील 14 दिवसांपासून त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखवले जात आहे. तिथे त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्याचे ओपिनियन मिळाले आहे.

सचिन वाझे आता रविवारी जेजे रुग्णालयात उपचारासाठी जाणार आहे. त्या काळात त्याची पत्नी त्याच्यासोबत राहू शकते, अशी परवानगी विशेष सत्र न्यायालयाने दिली आहे. मात्र सचिन वाझे प्रकरणात लवकरच चार्जशीटही दाखल केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.