‘जी २०’ देशांशी पुढील वर्षीची बैठक जम्मू काश्मीरमध्ये घेण्याचा भारताचा मनोदय आहे, मात्र याला चीनने जोरदार विरोध केला आहे. निकटचा सहयोगी पाकिस्तानच्या स्वरात स्वर मिळवत चीनने अधोरेखित केले की संबंधित बाजूंनी या समस्येचे ‘राजकारण’ टाळले पाहिजे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, काश्मीरबाबत चीनचे धोरण स्पष्ट आहे. हा मुद्दा भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्वीपासूनच आहे. संयुक्त राष्ट्रच्या संबंधित प्रस्ताव और द्विपक्षीय सहमतीनुसार योग्य तोडगा याबाबत निघणे आवश्यक आहे.
‘जी २०’चे सदस्य म्हणून चीन बैठकीत सहभागी होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना लिजियान यांनी सांगितले की, बैठकीत सहभाग घ्यावा किंवा नाही, याबाबत विचार करण्यात येणार आहे. ‘जी २०’ची जम्मू काश्मीरमध्ये बैठक घेण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने २५ जून रोजी विरोध केला होता.