शाळा सुरु करण्याबाबत सरकारकडून चाचपणी सुरु

राज्यात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. मात्र, डेल्टा आणि डेल्टा प्लस रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याबाबत चाचपणी सुरु आहे. आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, आधी सगळे शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांची पूर्ण लसीकरण झाले पाहिजे. तसेच आवश्यक काळजी घेण्याबाबत काय उपाय योजना केल्या आहेत, त्याचाही आढवा घेण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शाळा एवढ्यात तरी सुरू होणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. टास्क फोर्सने शाळा सुरू करण्याबाबत काही सूचना दिल्या आहेत, त्यावर सरकार विचार करत आहे. शाळा कधी सुरू करायच्या, याबद्दल टास्क फोर्सबरोबर पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर शाळा सुरू करण्याबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. आता मुंबईसह पुण्यात देखील नागरिकांना दैनंदिन व्यवहारात सूट देण्यात आली आहे. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरु वात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्यातरी शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार तयार नसल्याचे दिसून येत आहे.

त्याधी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यात येतील असे म्हटले होते. मात्र, याबाबत शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, शिक्षणमंत्रीस वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या की, ‘राज्य सरकारनं शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागावर (Education Department) सोपवला असला तरी टास्क फोर्सच्या दुसऱ्या आढवा बैठकीनंतर शाळा सुरु करण्याबाबत घोषणा होऊ शकते. कुठल्या भागातील शाळा सुरू करायच्या याबाबतचे निकष पुढील बैठकीत निश्चित केले जातील, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.