मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता गश्मीर महाजनीचा आज वाढदिवस

जन्म.८ जून १९८५

मराठी चित्रपटसृष्टीतला हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनी ओळखला जातो. गश्मीर महाजनीचे वडील म्हणजे जेष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी होत.

गश्मीर महाजनीचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. गश्मीर महाजनी कॉलेजमध्ये असताना स्टेट लेव्हलला टेनिस आणि नॅशनल लेव्हलला बास्केटबॉल खेळला आहे. एथेलॅटिक्सचीही त्याला आवड होती. क्रिकेटही खूप खेळलो. रविंद्र महाजनीच्या मुळे त्याला व्यायामाची आवड लागली. तीन वर्षांचा असताना तो त्यांच्यासोबत जीममध्ये जात असे. अभिनेते रविंद्र महाजनींनी आपल्या हिट चित्रपटांनी एक काळ गाजवल्यावर फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि त्यांनी पुण्यात कन्स्ट्रक्शन बिझनेस सुरू केला आणि त्यामुळेच गश्मीरने वडिलांचं सुपरस्टारडम अनुभवलं नाही. एका सामान्य मराठी कुटूंबातलं बालपण त्याला मिळालं. पण शेवटी अभिनयाचा वारसा त्याला रक्तातनंच मिळाला होता. त्यामुळे तो ही आपोआप अभिनयाकडे ओढला गेला. आपली आवड त्याने फक्त वडिलांना बोलूनच नाही दाखवली तर, त्यासाठी त्याने अभ्यासही सुरू केला. नसिरूद्दीन शाहंचे एक्टिंग क्लासेस त्याने जॉईन केले. वर्ल्डसिनेमातले लोकप्रिय चित्रपट पाहिले. प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय केला. विजय केंकरेंच्या ‘दादाची गर्लफ्रेंड’ नाटकातही तो दिसला. सिनेमॅटोग्राफर अशोक मेहतांना असिस्ट केलं. आणि मग पुढे त्याने मराठी चित्रपटात आपली कारकिर्द सुरू केली. देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘वन वे तिकिट’, ‘मला काही प्रॉब्लेम नाही’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.. त्यातील त्याच्या काही चित्रपटांनी घवघवीत यश मिळविले तर काही चित्रपटांनी यथातथाच व्यवसाय केला. परंतु गश्मीर महाजनीने आपला अभिनय अप्रतिम केला होता. मराठीमध्ये काम करता करता ‘पानीपत’ या बिग बजेट ऐतिहासिक हिंदी चित्रपटामध्ये गश्मीर महाजनीने एका वीर मराठा योद्धाची भूमिका केली होती. गश्मीर महाजनीने आपल्या वडिल रवींद्र महाजनी यांच्या बरोबर ‘पानिपत’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. गश्मीरने ‘जनकोजी शिंदे’ तर रवींद्र महाजनी यांनी ‘मल्हारराव होळकरांचे’ काम केले आहे. अनेक चित्रपटासह गश्मीरने रंगभूमीही गाजवली आहे. ‘अजिंक्य योद्धा’ – श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ या एक भव्य महानाट्यात त्यांनी बाजीराव पेशवेंची भूमिका गश्मीर महाजनी साकारली आहे. आपल्या अभिनयानं मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने काही मालिकांही केल्या होत्या. त्याची स्वत:ची डान्स अकॅडमी व इव्हेंट कंपनी आहे. डान्स अकॅडमी असलेला मराठी चित्रपटसृष्टीतील गश्मिर महाजनी हा एकमेव अभिनेता आहे. गश्मिर महाजनीने डिसेंबर २०१४ ला गौरी देशमुख बरोबर लग्न केले. ती मुळची अमरावतीची आहे. ती एमबीए ग्रॅज्युएट आहे. ती गश्मिर महाजनीची इव्हेंट कंपनीतच इव्हेंटचं प्लॅंनिगचे काम ती पाहते.

सध्या गश्मीर स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेत तो एका पत्रकाराची भूमिका करत असून त्याचे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गश्मीर लवकरच एका अॕक्शन सीरिजमध्ये झळकणार आहे. हा अॕक्शन सीरिजचे नाव श्रीकांत बशीर असून सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘श्रीकांत बशीर’ हा अॕक्शन पॅक ड्रामा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.