पुणे महापालिका निवडणूक 2022 साठीची आरक्षण सोडत आज काढण्यात आली आहेत. गेल्या वेळी 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यावेळी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे विद्यमान 29 नगरसेवकांना उमेदवारीसाठी पक्षांतर्गंत सहकाऱ्यांशी संघर्ष करावा लागणार आहे. त्यातूनच मग उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर वाढू शकते, त्यातही विशेष करून पुण्यातील पेठांमधील वार्डात भाजपात विद्यमान नगरसेवकांमध्ये पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी खूपच रस्सीखेच होऊ शकते, कदाचित अनेकांना घरी बसावं लागणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी काल आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 58 प्रभागातून 173 उमेदवार यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. त्यापैकी 87 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रत्येक प्रभागातील किमान एक जागा पुरुषांच्या वाट्याला आली असल्याने प्रस्थापितांना फारसा धोका नसल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, 58 प्रभागांसाठी 173 नगरसेवकांसाठी सोडती जाहीर झाल्यात. त्यात 29 नगरसेवकांवर बेघर होण्याची वेळ आली. दरम्यान, शहरातील 12 प्रभागांमध्ये दोन महिला एक पुरुष असे आरक्षण पडले आहे.