या जगात कोट्यवधी लोक रोज पॉर्न पाहतात. काही लोकांना तर पॉर्न पाहण्याचं व्यसन आहे. पॉर्न पाहण्याची सवय लागल्यामुळे त्याचे दुष्परिणामही अनेक लोकांमध्ये दिसून आलेले आहेत. सध्या तर एका पॉर्नवेड्या डॉक्यूमेंटरी प्रोड्यूसरबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्यूमेंटरी प्रोड्यूसरचे नाव मार्क जोहान असून त्याने फक्त पॉर्न पाहण्यासाठी तो काम करत असलेल्या कंपनीचे तब्बल एक कोटी रुपये उडवले आहेत.
पॉर्न पाहण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च केले
या घटनेबाबत ब्रिटनमधील वृत्त संकेतस्थळ metro.co.uk ने अधिक माहिती दिली आहे. पॉर्न पाहण्यासाठी मार्ग जोहान या माणसाने काम करत असलेल्या कंपनीचे तब्बल एक कोटी रुपये खर्च केले आहेत. तो या कंपनीत लॉजिस्टिक्सचं काम पाहत होता. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने त्याला एक क्रेडिट कार्ड दिले होते. या क्रेडिट कार्डच्या मदतीने त्याने अडल्ट साईटवर वेगवेगळे पॉर्न पाहण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर 55 वर्षीय मार्क याच्यावर कंपनीने खटला भरला .
मार्क यांना सन 2019 मध्ये त्यांच्या कंपनीने एक क्रेडिट कार्ड दिले होते. या कार्डच्या मदतीने त्यांनी आपली पॉर्न पाहण्याची सवय पुढे चालू ठेवली. हा प्रकार एक वर्षे तसाच चालू राहिला. नंतर कंपनीचे ऑडिट झाल्यानंतर तब्बल 1 कोटी रुपयांचा ताळमेळ बसत नसल्याचे समजले. सखोल चौकशी केल्यानंतर मार्क यांनी हे पैसे उडवल्याचे कंपनीला समजले.
दरम्यान, मार्ग यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ऑक्टोबर 2019 ते 2020 नोव्हेंबर या काळात त्यांच्याकडून हे कृत्य घडले. त्यांनी 2020 मध्ये ते काम करत असलेली कंपनी सोडली आहे. या कृत्याबात त्यांनी माफीदेखील मागितलीय. मात्र, कोर्टाने त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.