अजूनही जवळपास 72 हजार एसटी कर्मचारी संपावर

एक महिना उलटून गेला तरी तब्बल 72 हजार एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. एसटीच्या मोठ्या संपानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक 41 टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, हे आधीच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. एसटी संपकरी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12% वरून 28% करण्यात आला, घरभाडे भत्ता 8-16-24 या पटीत वाढवून देण्यात आला. तसेच अंतरिम वेतन वाढ देखील दिली. अशी माहिती देण्यात आली आहे. तर जे कर्मचारी संपावर आहेत त्याचे पगार झाले नाहीत. अजूनही जवळपास 72 हजार एसटी कर्मचारी संपावर आहेत.

राज्यात दुपारपर्यंत 250 पैकी 123 डेपोमध्ये वाहतूक सुरू झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हा आकडा आणखी वाडण्याची शक्यता आहे. तर संप चिघळल्याने आजही काही ठिकाणी एसटीवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्यााचं समोर आलं आहे. काही ठिकाणी वाहतूक सुरू करताना मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याचंही पहायला मिळालं. राज्यात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्याही जवळपास 10 हजारांच्या आसपास गेली आहे, तर सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही तब्बल 2 हजारांच्या वर गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.