राज्यात टप्प्या टप्प्यानं निवडणुका : एकनाथ शिंदे

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील, अशी माहिती दिली आहे. तर, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका एकत्र होणार नाहीत, असंही ते म्हणाले. राज्यातील सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मागील वर्षभरापासून रखडलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची चिन्हं आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील, आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होतील अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्व निवडणुका या एकत्र नव्हे, तर टप्प्याटप्प्याने होतील, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील काही महापालिकांची मुदत एप्रिल महिन्यात संपत असून त्यानुसार एप्रिल महिन्यात महापालिकांच्या निवडणुका लागण्याची चिन्हं आहेत. तर नगरपालिका निवडणुका या त्यापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. त्यामुळं राजकीय पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनाने एयरपोर्ट प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट करून त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करूनच पुढे त्यांना शहरात प्रवेश करू द्यावा. तसेच हाय रिक्स देशातील प्रवाशांची माहिती तात्काळ द्यावी व त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावे, तसेच ठाण्यात फक्त डोंबवलीत एका व्यक्तीला ओमिक्रॉन ची बाधा झालीय आणि तो ही सुखरूप आहे. जेवढे ठाण्यात परदेशातून प्रवाशी आलेत त्या सर्वांच्या करोना चाचण्या झाल्या असून, सर्वाना क्वारंटाईन करण्यात आले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.