कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले. जखमींना सीपीआर जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
शंतनू शिरीष कुलकर्णी (२८, मोरेवाडी) व शुभम हेमंत सोनार (२४, राजारामपुरी) अशी मृतांची नावे आहेत. सौरभ रवींद्र कणसे (२६, राजारामपुरी) व संकेत बाळकृष्ण कडणे (२१, सांगली) हे जखमी झाले आहेत.
अपघातातील चौघेजण इनोवा मोटारीतून कोल्हापूर जवळील वाशी या गावी गेले. तेथून जेवण करून मध्यरात्री ते परत येत होते. ही मोटार शुभम चालवत होता. कोल्हापूरजवळ असलेल्या पुईखडी टेकडीवर मोटारीचा ताबा सुटल्याने ती २५ फूट खोल दरीत कोसळून उलटली.