वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा शाळा बंद होणार?

देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस  बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शाळा कॉलेजेस सुरु झाले होते. मात्र आता कोरोनाच्या ओमिक्रोनच्या नव्या व्हेरिएन्टनं परत चिंता वाढवली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण निर्बंध हटवल्यानंतर आता पुन्हा राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

इतकंच नाही तर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर किंग खान शाहरुख खान, कतरीना कैफ, आणि इतर काही कलाकारही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होतोय का अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या या वाढत्या रुग्ण परिस्थितीवर शाळा पुन्हा बंद होणार का? कॉलेजेसच्या परीक्षा होणार का? शाळा बंद झाल्यात तर विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं होणार? याबाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री

“कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनाचे सर्व नियम पाळूनच वर घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे.” असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.