यंदा पंढरपूर वारी निघणारच, अजित पवार यांनी केली घोषणा

राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, अजूनही राज्य सरकारने निर्बंध लावण्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशातच गेल्या दोन वर्षांपासून रखडेलेली पंढरपूर वारी यंदा होणारच असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

पुण्यात रविवारी अजित पवार यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने बैठक घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबद्दल माहिती दिली.

सगळ्यांना विश्वासात घेऊन वारी सोहळयाचं नियोजन पूर्ण केलं आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरात 15 लाख भाविक असतील. त्याचंही नियोजन झालं आहे. 12 जूनला जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा विभागीय आयुक्तना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

पंढरपूरच्या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होणार आहे. त्यामुळे  वारीमध्ये कोरोना लस, बूस्टर डोस हवा असेल तर तशी व्यवस्था करणार आहोत. वारकऱ्यांना डोस घेण्यासंदर्भात आवाहन करणार आहोत. मात्र, वारीमध्ये चाचण्या करणार नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

पालखी सोहळ्याला बंदोबस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारं आहोत.  यशदामध्ये हे प्रशिक्षण देणार आहोत. वारीत लोकांना सहभागी होता व्हावं यासाठी ज्यादा बसेस सोडणार आहोत.  अष्टविनायक परिमंडळ विकास आरखडा तयार केला आहे भाविक आणि पर्यंटकांच्या सुविधांसाठी प्रकल्प राबविणार आहोत. यासाठी 50 कोटी खर्च अपेक्षित आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत येणार आहेत. ते आले तर त्यांचं स्वागत करायला मी जाणारं आहे. ती आपली संस्कृती आहे आहे. असंही अजित पवारांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.