महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या होणार सुनावणी
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत घरोबा केला. शिंदे गटाने शिवसेना आमचीच असा दावा केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाला उत्तर देता देता नाकीनऊ आले. सरन्यायाधीशांच्या प्रश्नांमुळे ख्यातनाम वकील हरीश साळवे यांना समाधानकारक उत्तर देता आली नाही. त्यामुळे उद्या गुरुवारी साळवे यांना म्हणणं लेखी मांडण्यास सांगितले आहे. तसंच राज्यपालांच्या भूमिकेवरही काही प्रश्नचिन्ह निर्माण झााली आहे. उद्या गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठापुढे ही सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदेंच्या वतीने वकिल हरिश साळवे, निरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली.
Commonwealth मध्ये भारताची गोल्डन कामगिरी सुरूच, टेबल टेनिसमध्येही सुवर्ण पदक!
टेबल टेनिसच्या टीमने भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये 11 वे पदक मिळवून दिलं आहे. पुरुष टीमने फायनलमध्ये सिंगापूरचा 3-1 ने पराभव करत गोल्ड मेडल पटकावलं. जी साथीयानच्या शानदार कामगिरीमुळे भारताला ही ऐतिहासिक कामगिरी करता आली आहे. त्याने डबल्समध्ये हरमीत देसाईसोबत डबल्सचा हा सामना जिंकला. यानंतर आपल्या सिंगल्सच्या सामन्यातही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत विरोधी खेळाडूला धूळ चारली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला आतापर्यंत 5 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 3 ब्रॉन्झ मेडल मिळाली आहेत. टेबलमध्ये भारतीय टीम सहाव्या क्रमांकावर कायम आहे. त्याआधी आजच महिला लॉन बॉल्स टीमनेही गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला.
प्रॉपर्टीसाठी बायकोला फसवलं; खोटी पत्नी, खोटं आधारकार्ड वापरून प्रॉपर्टी लाटायचा प्रयत्न
प्रॉपर्टीसाठी काहीवेळेस माणसं कोणत्याही थराला जातात. नातेवाईक, कुटुंबीयांची फसवणूक केली जाते. अशाच प्रकारच्या फसवणुकीचा एक प्रकार अहमदाबादमध्ये समोर आला आहे. मणिनगर (Maninagar) इथला रहिवासी आशिष देसाई यानं आपली आधीची पत्नी म्हणून दुसऱ्याच एका बाईला सबरजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये उभं केलं. इतकंच नाही तर तिचं खोटं आधारकार्डही (Fake Aadhar card) सादर केलं आणि मालमत्तेतील दोघांच्या वाट्यातील तिच्या नावे असलेला 50% भागही लाटण्याचा प्रयत्न केला. 2018 मधलं हे प्रकरण आहे. याबद्दल टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर वृत्त देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या कंपनीच्या नावाने बनावट बिडी विकणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड
राज्यसभा सदस्य खा. प्रफुल पटेल यांच्या गोंदियातील सी जे कंपनीच्या नावाने बनावट बिडी तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली आहे. बनावट बिडी तयार करण्यासाठी वापरला जाणारा साहित्य देखील मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे.खा. प्रफुल पटेल यांच्या वडिलानांच्या नावाने सी. जे. कंपनीने मनोहर बिडी बाजारात चलनात आहे. त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी देखील असल्याने याच नावाचा फायदा घेऊन एकाने बिडीची विक्री केल्याची माहिती मिळाली. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली गावातील सुनील बोरकर ह्या इसमाने बिर्शी गावात एक भाड्याची खोली घेत हा प्रकार सुरू केला होता. या ठिकाणी मनोहर फोटो बिडी, 27 नंबर स्पेशल बिडी, मंकी बॉय बिडी यासारख्या नामंकित ब्रँडचे बनावट स्टिकर तयार करून विक्री करत होता.
भारतीय बॅडमिंटन संघाची ‘रुपेरी’ कामगिरी, पी व्ही सिंधूची झुंज व्यर्थ
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघानं ‘रुपेरी’ कामगिरी केली आहे. बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला मलेशियाकडून ३-१ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय बॅडमिंटन संघाचं सलग दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. भारताला ‘रौप्य’ पदकावर समाधान मानावं लागलं. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे १३ वे पदक आहे. याआधी भारतीय बॅडमिंटन संघानं २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.
आमदार-खासदार गेले आता क्रिकेटपटूही चालले! टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी घेतली शिंदेंची भेट
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. एकनाथ शिंदेंनी पहिले आमदार मग खासदार आणि त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर आपल्या बाजूने वळवलं. शिंदेंकडे जवळपास रोजच शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी दाखल होत असतानाच दोन क्रिकेटपटूंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आणि सुरेश रैना यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. रैना आणि केदार जाधव यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
SD Social Media
9850 60 3590