बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय वेटलिफ्टिंगपटू विकास ठाकूरने ९६ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. हे भारताचे एकूण १२वे तर वेटलिफ्टिंगमधील आठवे पदक ठरले आहे.
विकासने स्नॅच फेरीत १५५ किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीमध्ये १९१ किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण ३४६ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. सामोआचा वेटलिफ्टिंगपटू डॉन ओपालॉग विकासच्या पुढे होता. त्याने एकूण ३८१ किलो वजन उचलले. या वजनासह ओपलॉगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमही केला.
२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतीय वेटलिफ्टिंगपटूंनी जोरदार कामगिरी केली आहे. मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा आणि अचिंत शेउली यांनी स्वर्ण, संकेत महादेव सरगर, बिंदियारानी देवी आणि विकास ठाकुर यांनी रौप्य तर गुरुराजा ठाकुर आणि हरजिंदर कौर यांनी कांस्यपदक पटकावले आहे