जागतिक राजकारणाविषयी राज ठाकरे यांचा अभ्यास आहे असं बोलतात पण महाराष्ट्राच्या राजकारणात बद्दल त्यांना किती आहे हे मला माहीत नाही. राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. दंगल कशाला म्हणतात हे राज ठाकरे यांना माहित नाही. राज ठाकरे यांनी आजोबांची म्हणजेच प्रबोधनकारांची 4 ते 5 पुस्तके वाचायला हवी होती. त्यांना जात पात काय असतं हे समजलं असतं आणि जात-पात चे जन्मदाते कोण आहेत हेही समजलं असतं. जातपात कशाला म्हणतात ? मी एका मागासवर्गीय विमुक्त भटक्या जातीचा आहे. छगन भुजबळ माळी समाजाचे आहेत ते आता राज्याचे अन्न नागरीपुरवठा मंत्री आहेत. तटकरे लोकसभेत खासदार आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचं आवडतं काम आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला.
तुमच्या घराच्या बाहेर दलित विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं होतं. त्यांना कसं मारलं गेलं होतं. तुमच्या घराच्या बाहेर आठवतं का तुम्हाला ? तुमचं प्रेम, तुमच्या डोक्यातील घृणा हे आजपर्यंत विशिष्ट कृतीतून कायमच दिसलं आहे. तुमची मानसिकता काय आहे हे महाराष्ट्राला उशिरा कळली आहे. शरद पवारांवर टीका केल्या शिवाय यांना हेडलाईन मिळत नाही. हे गणित ठेवूनच लोक भाषण करतात. मला आश्चर्य वाटतं जो माणूस एका प्रगतशील विचारांचा वाटायचा, की माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही असा टोला देखील जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला.
लाखोंच्या सभेसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलन फार सोपं असतं. पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील याचा जरा तरी विचार करा. ज्या घरात जन्माला आला तुम्ही त्या घरात महाराष्ट्राची संयुक्त चळवळ उभी राहिली आहे. त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका. पाच वर्षांपूर्वी जे राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करायचे की असे उद्योग आणले पाहिजेत तसे उद्योग आणले पाहिजे. कधी रतन टाटाशी चर्चा, कधी गोदरेजशी चर्चा, कधी यांच्याशी चर्चा कधी त्यांच्याशी चर्चा, असं एक विकासाचं मॉडेल घेऊन पोरांना नोकऱ्या लावतो. असं म्हणत ब्लूप्रिंट देणारे राज ठाकरे आज त्याच पोरांना मशिदीच्या बाहेर भोंगे लाण्यास सांगतात. ही विचारांची प्रगती आहे की अधोगती आहे हे समजत नाही असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ग्रामीण विभागातल्या आमदारांचे कुठे रो हाऊस असतील आणि ती राज ठाकरेंना माहित असतील, तर त्या आमदारांची नावे आम्हाला सांगावी. त्यांना आम्ही घरे देणार नाही. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. त्यामुळे महाविकासआघाडी कोण चालवतं असं म्हटलं तर ते उद्धव ठाकरे चालवतात. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत, की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात. त्यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणार वक्ता असला की जातात भाषणाला हा इतिहास आहे महाराष्ट्राचा अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवरती केली