बॉलीवूड अभिनेत्री ते राजकारणी जया प्रदा यांचा आज 3 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. जया प्रदा यावर्षी 59 वा वाढदिवस साजरा करतील. जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला. जयाप्रदा यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत.
बॉलीवूडमध्येच नव्हे तर राजकारणातही त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तेलगु चित्रपट त्यांनी सुरूवातीला काम केलं. तिथून जया प्रदा यांनी अभिनेत्री म्हणून करिअर सुरुवात केली. त्यांनी अनेक विविध भाषांमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. आजही त्याचे चाहते चित्रपट आवर्जुन पाहत असतात. किंवा एखाद्या चित्रपटातली भूमिका कशी साकारली होती त्याचं उदाहरण देतात.
त्यांच्याकारकिर्दीला तेलुगू चित्रपट ‘भूमिकोसम’मधून सुरुवात केली. 1979 साली विश्वनाथ दिग्दर्शित ‘सरगम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पण त्याला ओळख मिळाली ती 1984 मध्ये आलेल्या ‘तोहफा’ या चित्रपटामधून. या चित्रपटात त्यांनी तत्कालीन सुपरस्टार जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील झाले होते. यानंतर त्यांनी ‘शराबी’, ‘आज का अर्जुन’, ‘औलाद’, ‘मा’, ‘सिंदूर’, ‘आखरी रास्ता’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘कामचोर’, ‘पाताळ भैरवी’, ‘असे चित्रपट केले. आवाज’ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अभिनेत्री जया प्रदा यांनी 1994 मध्ये तेलुगु देसम पार्टीमधून आपला राजकीय प्रवास सुरू केला. दोन वर्षांनंतर, 1996 मध्ये, त्यांना तेलुगू देसम पक्षाने राज्यसभेवर पाठवले. पण काही गोंधळामुळे 2004 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक जिंकल्या आणि रामपूरमधून खासदार झाल्या. पण 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीत रामपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण जया प्रदा त्या निवडणूक हरल्या, त्यानंतर जया प्रदा राजकारणापासून लांब राहत असल्याचे पाहायला मिळत आहे.