अमित शाहांच्या मध्यस्तीनंतरही मणिपुरात हिंसाचार सुरूच, गोळीबार-जाळपोळीत नऊ जणांचा जागीच मृत्यू
गेल्या महिन्याभरापासून मैतई आणि कुकी समुदायातील वादामुळे मणिपूर राज्यात हिंसाचार उफाळला आहे. काल (१३ जून) झालेल्या हिंसाचारात तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान एक गट मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील ऐगिजांग गावात शिरला. त्यांच्याकडून गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात नऊ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरला भेट देऊन शांतता समिती नेमली होती. त्यांच्या मध्यस्तीनंतरही राज्यात हिंसाचार सुरू आहे.
‘बीड पॅटर्न’चा देशात डंका, रवीनं मिळवले 720 पैकी 700 गुण
नुकताच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नेहमीच कोटा आणि लातूर पॅटर्नची देशभर चर्चा असते. मात्र, यंदा बीड पॅटर्न हिट ठरला आहे. बीडमधिल जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या मुलानं नीट परीक्षेत 720 पैकी तब्बल 700 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे रवी महेश सातपुते यानं कोणत्याही नावाजलेल्या पॅटर्नची ट्युशन न लावता अभ्यास करून हे यश मिळवलंय. त्यामुळे त्याच्या यशाची सर्वत्र चर्चा असून त्याला भारतातील नामांकित मेडिकल कॉलेज ‘एम्स’मध्ये प्रवेश मिळेल अशी खात्री वाटतेय.
जयललितांविषयी वक्तव्य, भाजप-अद्रमुकमध्ये तणाव
तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक-भाजप युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.अण्णा द्रमुकचे सरचिटणीस के. पलानिस्वामी म्हणाले, की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जयललितांवर केलेल्या टीकेमागे त्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच आहे. त्यात राजकीय अप्रगल्भता आणि बेजबाबदारपणा दिसतो. या संदर्भात आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात ठराव केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग! गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्ष प्रवेश
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे, त्यातच आता भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालं आहे. काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 18 जूनला नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाचा फोटो समोर आला आहे.आशिष देशमुख हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
ज्येष्ठ गायिका शारदा अय्यंगार यांचे निधन, 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका शारदा अय्यंगार यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवासांपासून शारदा अय्यंगार कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होत्या. शारदा यांनी बॉलिवूडशिवाय तेलुगू, मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांचे सूरज’ चित्रपटातील ‘तितली उडी उड’ हे गाणे जास्त गाजले होते.शारदा राजन अय्यंगार यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 रोजी तामिळनाडूतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. शारदा यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. शारदा यांना 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जहाँ प्यार मिली’ या चित्रपटामधील ‘बात जरा है आपस की’ या हिट गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
‘आदिपुरुष’ची रिलीज आधीच कोट्यवधीची कमाई
अभिनेता प्रभास, कृती सेनन आणि मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे प्रमुख भूमिकेत असलेला आदिपुरूष हा सिनेमा संपूर्ण देशात रिलीज होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 16 जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटाची कमाई जास्तीत जास्त व्हावी यासाठी निर्मात्यांनी एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी शेकडो कोटी रुपयांचा करार केला आहे. सध्या या चित्रपटाच्या व्हीएफएक्सची आणि रामायणाच्या मॉर्डन अडेप्टेशनची चर्चा जोरात सुरू आहे. पण या सिनेमाची ओटीटी डील ऐकून तुमचे डोळे भिरतील..हे मात्र नक्की..आदिपुरुष सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 52 दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. यासाठी निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म अॕमेझॉन प्राईमशी करार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॕमेझॉनने आदिपुरुषच्या निर्मात्यांना जवळपास 250 कोटी रुपये दिले आहेत. भारतात अॕमेझॉन आणि नेटफ्लिक्स यांच्यात जोराची स्पर्धा आहे. त्यामुळे सिनेमा रिलीज होण्याआधीच निर्मात्यांना खूप फायदा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुषने आपले म्युझिक, सॅटेलाइट आणि इतर डिजिटल राइट्स विकून तब्बल 432 कोटी रुपये कमावले आहेत.
सचिनच्या मुलाला BCCIचे खास आमंत्रण! तीन आठवड्यांच्या स्पेशल ट्रेनिंगनंतर अर्जुन करणार टीम इंडियात प्रवेश?
सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन याला मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिली होती. लवकरच सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी तयार होत असलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २० आश्वासक अष्टपैलू खेळाडूंना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे तीन आठवड्यांच्या शिबिरासाठी बोलावले आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे, जो गोव्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला होता, ज्याने इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स साठी पदार्पण केले होते.
SD Social Media
9850 60 3590