ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॕथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. नीरजनं भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे. नीरज चोप्रासमोर फायनल्स गाठण्यासाठी 83.5 मीटरचं टार्गेट होतं. परंतु, नीरजनं 86.65 चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्यानं क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपलं लक्ष्य स्पष्ट केलं आहे. क्वालिफाइंग राउंडच्या ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे.