ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच वेळापत्रक जारी झालं आहे. यंदाचा टी-20 वर्ल्डकप (T-20 World cup) ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच (Australia) विद्यमान टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आहे. प्रत्येक वर्ल्डकप स्पर्धेत कोट्यवधी चाहत्यांना प्रतिक्षा असते, ती भारत-पाकिस्तान सामन्याची. 2022 वर्ल्डकप मध्येही भारत-पाकिस्तान भिडणार आहेत.
आयसीसीने शुक्रवारी सकाळी नवीन शेड्युलड जारी केलं. टी-20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सुपर-12 राऊंडची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होईल. सुपर-12 मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या लढती
भारत विरुद्ध पाकिस्तान 23 ऑक्टोबर – मेलबर्न
भारत विरुद्ध ग्रुप ए रनर अप 27 ऑक्टोबर – सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 30 ऑक्टोबर – पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश 2 नोव्हेंबर – एडिलेड
भारत विरुद्ध ग्रुप बी विनर 6 नोव्हेंबर – मेलबर्न
टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि दोन क्वालिफायर टीमसोबत ग्रुप-2 मध्ये ठेवले आहे. टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. यावेळी पाकिस्तानने दहा विकेटने भारतावर विजय मिळवला होता. त्यावेळी वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते.
टी-20 वर्ल्कप स्पर्धेची सुरुवात 16 ऑक्टोबर रविवारपासून होणार आहे. फायलन 13 ऑक्टोबर रविवारी होणार आहे. एकूण 16 टीम्स या वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार असून ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.