३० वर्षांपूर्वी ११ रुपयांचा शेअर आता झाला १ लाखाचा, हजार रुपये गुंतवणूक करणारे बनले करोडपती
७१ वर्षांपूर्वी टायरच्या व्यवसायात उतरलेल्या एका व्यक्तीला कधी तरी टायरच्या व्यवसायात आपली कंपनी भारतात नंबर वन होईल, असे वाटले नसेल. पण कष्ट करणाऱ्यांचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. ही गोष्ट आहे मद्रासमधील टायर बनवणाऱ्या कंपनीची. तसेही कंपनी नेहमीच लोकांच्या गाड्यांवर वर्चस्व गाजवते, परंतु आज ती सर्वाधिक चर्चेत आहे. भारतातील टायर व्यवसायात ही कंपनी केवळ नंबर वन बनली नाही, तर तिने शेअर्समध्येही इतिहासही रचला आहे. या इतिहासामुळे आज अनेक गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत, तेही केवळ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत.भारतीय शेअर बाजारातील मूल्यानुसार सर्वात मोठा स्टॉक असलेल्या MRF लिमिटेडने मंगळवारी (१३ जून २०२३) पुन्हा एक नवीन विक्रम रचला आहे. एमआरएफच्या समभागांनी एक टक्क्याने वाढ करून १ लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. भारतीय बाजारपेठेत १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडणारा हा पहिला शेअर ठरला आहे. आज व्यापार सत्राच्या सुरुवातीला एमआरएफचे शेअर्स १.४८ टक्क्यांनी वाढून ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १,००,४३९.९५ रुपयांवर पोहोचले. तसेच शेअरने BSE वर १,००,३०० च्या पातळीला स्पर्श केला. एमआरएफ स्टॉकची मागील सर्वोच्च पातळी ९९,९३३ रुपये प्रति शेअर होती, तो ८ मे रोजी या पातळीवर पोहोचला होता.
मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस नव्हे, एकनाथ शिंदेंना जास्त पसंती
शिवसेनेच्या शिंदे गटाने महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर एक मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात शिंदे गटाने एक सर्वेक्षण अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत. या जाहिरातीतल्या मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचं आहे, तर देवेंद्र फडणवीसांना २३.२% जनतेला मुख्यमंत्रीपदावर बसलेलं पाहायचं आहे.शिंदे गटाने ही जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कल्याण लोकसभेवरून दोन्ही पक्षांमध्ये वातावरण तापलं आहे. तसेच शिंदे गटातील काही मंत्र्यांना भाजपाचा विरोध असल्याने राज्य सरकारचा मंत्रिमडळ विस्तार रखडल्याचं बोललं जात आहे. अशातच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचा दावा शिंदे गटाने केल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याची चर्चा आहे. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी जाहिरात केली होती. परंतु शिंदे गटाने राष्ट्रामध्ये ‘मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली जाहिरात प्रसिद्ध करून एकनाथ शिंदे अधिक लोकप्रिय असल्याचा केला आहे.
१५ कोटींचं बजेट, ९१२ कोटींचा व्यवसाय; ‘पठाण’, ‘RRR’, किंवा ‘दंगल’ नव्हे तर ‘हा’ आहे सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
नुकत्याच आलेल्या ‘द केरला स्टोरी’ने तर इतिहासच रचला. अगदी कमी म्हणजेच २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात २३८.८७ कोटींचा व्यवसाय केला. याआधीही अशा बऱ्याच कमी बजेटच्या चित्रपटांनी उत्तम व्यवसाय केला. आमिर खान प्रोडक्शनचा २०१० साली आलेला ‘पिपली लाईव्ह’ या चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली होती. आयुष्मान खुरानाचा निव्वळ १० कोटींमध्ये बनलेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाने ५५ कोटींचा व्यवसाय केला होता.इतकंच नव्हे तर आयुष्मान आणि तब्बू यांच्या १७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘अंधाधून’ने जगभरात ४४० कोटींची रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली होती. पण तुम्हाला माहितीये का की सगळ्यात कमी बजेटमध्ये बनलेल्या आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट वेगळाच आहे. ‘डीएनए’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने कमाईमध्ये ‘मुघल-ए-आजम’, ‘शोले’पासून ‘दंगल’, ‘केजीफ’, ‘पठाण’लाही मागे टाकलं आहे.
हा चित्रपट म्हणजे आमिर खान प्रोडक्शन या बॅनरखाली बनलेला जायरा वसिमची मुख्य भूमिका असलेला ‘सीक्रेट सुपरस्टार’. १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ९१२.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. केवळ भारतातच नव्हे तर इतरही देशात या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आमिर खाननेही एक छोटी भूमिका निभावली होती.
२५ टक्के लोकांना पुरुषांनी महिलांना मारहाण करणं योग्य वाटतं; UNDP च्या अहवालाचे धक्कादायक निष्कर्ष!
गेल्या काही वर्षांमध्ये फक्त भारतच नव्हे, तर जगभरात महिला सशक्तीकरणासाठी असंख्य मोहिमा काढण्यात आल्या. उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या. मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. महिलांचा सामाजिक दर्जा, त्यांच्याकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन यात बदल झाल्याचं चित्रही निर्माण झालं. पण UNDP अर्थात युनायडेट नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालातून या समजाला तडे देणारे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. यातलाच एक निष्कर्ष म्हणजे जगातल्या सरासरी २५ टक्के लोकांना पुरुषांनी महिलांना मारहाण करणं योग्य वाटतं!संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत Gender Social Norms Index हा अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला सशक्तीकरण, सबलीकरणाच्या कितीही गप्पा झाल्या, तरी अजूनही जागतिक स्तरावर महिलांबाबतचा समाजाचा दृष्टीकोन पुरेसा प्रगल्भ झाला नसल्याचंच समोर आलं आहे. जगातली ८५ टक्के लोकसंख्या राहणाऱ्या ८० देशांमधील माहिती या अहवालासाठी गोळा करण्यात आली आहे. वर्ल्ड व्हॅल्यू सर्वेच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या माहितीचा यासाठी वापर करण्यात आला. त्यात २०१० ते २०१४ आणि २०१७ ते २०२२ या काळातील माहिती प्रामुख्याने या सर्वेसाठी वापरण्यात आली आहे.
एक्स्प्रेस वेवर टँकर पेटला
पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर केमिकलचा टँकर जळून खाक झाला आहे. यात होरपळलेल्या चौघांचा मृत्यू तर दोघे जखमी झालेत, यामुळे दोन्ही कडची वाहतूक तब्बल साडे पाच तास ठप्प होती. मुंबईच्या दिशेने मिथेनॉल केमिकलची वाहतूक करणारा टँकर डिव्हाईडरला धडकला आणि टँकर पलटी झाला. त्यानंतर मिथेनॉल महामार्गावरील पुलावर पसरलं.तेच केमिकल खालून दुचाकीवरून निघालेल्या तिघांच्या अंगावर पडलं. मग काही कळायच्या आत केमिकलने पेट घेतला, यात टँकर मधील आणि खालच्या मार्गावरील असे सहा जण होरपळले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. सायंकाळचे पाच वाजले तरी परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अनेक प्रवासी अडकले. हजला जाणाऱ्यांची मुंबई विमान तळावर पोहचण्यासाठी धावपळ सुरू झाली. देशातील सर्वोत्तम महामार्गावरील यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
चिमुरड्यांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे 59 मुलांची सुटका
सोमवारी (12 जून) देशभरात बाल कामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला. याला एक दिवस उलटत नाही तोच बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयीत तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. दानापूर पुणे एक्सप्रेस मधून भुसावळ येथे ताब्यात घेण्यात आलेल्या 29 अल्पवयीन मुलांची करण्यात सुटका आली आहे. या सर्व मुलांचे वय 8 ते 15 वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्हा बालकल्याण विभागाच्या वतीने 29 मुलांना बिहार राज्यातील अररिया व पूर्णिया बाल कल्याण विभागासमोर करण्यात येणार सादर करण्यात येणार आहे.
‘इतकेच लोकप्रिय असाल तर…’, त्या सर्व्हेनंतर अजितदादांचं शिंदेंना थेट आव्हान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या लोकप्रियतेच्या सर्व्हेची जाहिराती आज वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व्हे आणि जाहिरातींवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. अशी जाहिरात कधी पाहिली नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला पुन्हा हेच मुख्यमंत्री व्हावे, असं वाटत आहे. हे पाहून आनंद झाला, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.लोकांचा इतका पाठिंबा आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही? त्यांना निवडणुका घेण्याची भीती वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्या जाहीर करा आणि मैदानात या. जनता कुणाच्या पाठीशी आहे हे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळेल, असं थेट आव्हान अजित पवारांनी सरकारला दिलं आहे.
कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे निर्णय
शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज ( १३ जून ) पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने मदत देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच. लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
अभियांत्रिकी, फार्मसीसह अन्य बावीस अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १५ जूनपासून
सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्पा म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी पदवीसाठी या परीक्षेतील गुण महत्त्वाचे ठरतात. त्यानुसार सीईटी सेलकडून बावीस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.एमबीए, एमसीए, विधी हे पाच वर्षीय अभ्यासक्रम, कृषी, अभियांत्रिकी, फार्मसी यासाठी १५ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. तर हॉटेल मनेजमेंट, नियोजन, बी.टेक, फाईन आर्टस व अन्य अभ्यासक्रमांची नोंदणी १६ जूनपासून सुरू होईल. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.
नितीन गडकरी म्हणतात, “बँकांचे सर्वाधिक कर्ज बुडवणारे ग्राहक श्रीमंत गटातील”
विविध बँकांचे कर्ज बुडवणारे सर्वाधिक ग्राहक हे श्रीमंत गटातील असतात, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील वनामती संस्थेत आयोजित रोजगार मेळाव्यात गडकरी बोलत होते. याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते शासकीय नोकरीप्राप्त ५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.गडकरी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्थानापन्न झाल्यापासून मुद्रा लोन, स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराच्याही अनेक संधी मिळाल्या आहे. बँकांचे निरीक्षण केल्यास गरीब ग्राहक नियमित कर्ज भरताना दिसतात. मध्यमर्वीय ग्राहक अधून-मधून हप्ता चुकवतात. तर श्रीमंत गटातील ग्राहक मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडवताना दिसतात. ई-रिक्षा घेणाऱ्यांकडून नियमित कर्जाचे हप्ते भरले जात असल्याचेही गडकरी म्हणाले. सरकारच्या प्रयत्नाने आता युवकांना कौशल्य विकासातून विविध क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहे. त्यांनी कौशल्याच्या जोरावर स्वत:चा उद्योग उभारून नोकरी मागणारे होण्याऐवजी नोकरी देणारे व्हावे, असेही ते म्हणाले.
कराचीच्या अणुऊर्जा प्रकल्पात भयंकर स्फोट?
लाईटहाऊस जर्नालिज्मला मोठ्या प्रमाणात एक ट्वीट व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. ट्वीट मध्ये म्हटले होते की, “कराची मध्ये असलेल्या अणुऊर्जा प्रकल्प म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये भीषण स्फोट झाला आहे.”. जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटीमधील एक प्रोफेसर, स्टीव्ह हांक यांनी व्हायरल व्हिडिओ आपल्या ट्विटर प्रोफाइल वर शेअर केला आहे.
दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के, पाकिस्तान आणि चीनमध्येही हादरली जमीन
भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. दिल्लीतल्या एनसीआर ते जम्मूपर्यंत हे धक्के जाणवले आहेत. दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी हे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्र जम्मू काश्मीरचं डोडा आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या झटक्यांची तीव्रता ५.४ इतकी नोंदवली गेली.श्रीनगरच्या एका व्यक्तीने भूकंपाविषयी सांगितलं की आज जे धक्के बसले ते तीव्र होते. जी मुलं शाळेत गेली होती ती घाबरली होती. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसले आहेत. EMSC च्या माहितीनुसार किश्तवाडच्या ३० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण पूर्व भागात हा भूकंप आला.
हाँगकाँगवर भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत विजय
उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीलने दोन धावांत पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या २३ वर्षांखालील महिला संघाने महिला उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेत नवख्या हाँगकाँग संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. आणि आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या २० वर्षीय श्रेयंकाच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीसमोर हाँगकाँगचा संघ १४ षटकांत अवघ्या ३४ धावा करत गारद झाली.भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हाँगकाँगसाठी केवळ एका खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली तर तब्बल ४ खेळाडूना भोपळाही फोडता आला नाही. हाँगकाँगची सलामीवीर मारिको हिलने १९ चेंडूत सर्वाधिक १४ धावा केल्या. अंडर-१९ विश्वचषकात भारताची स्टार खेळाडू डावखुरी फिरकीपटू मन्नत कश्यप (२/२) आणि लेग-स्पिनर पार्श्वी चोप्रा (२/१२) यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले.
SD Social Media
9850 60 3590