३ जून १९७३ साली अमिताभ बच्चन आणि जया बच्चन विवाहबद्ध झालेत.
एकिकडे ग्लॅमरच्या झगमगाटात अनेक जोडप्यांमध्ये वाद होऊन ते वेगळे होतात, त्यामध्ये बिग बी आणि जया यांची जोडी एक आदर्श उदाहरण म्हणून समोर आली आहे. बिग बींच्या ट्विटरवर २८ मिलियन हून अधिक फॅन्स आहेत. बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी जोड्यांपैकी एक असलेल्या अमिताभ आणि जया यांची लव्ह स्टोरी रंजक आहे. शिक्षण सुरू असतानाच जया यांचे अमिताभ यांच्यावर प्रेम जडले होते. अमिताभ यांच्या जीवनातील एक किस्सा कायम चर्चेत असतो. तो म्हणजे त्यांची आणि रेखाची लव्ह स्टोरी. या प्रकरणामुळे त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यातही आले होते. पण त्या दोघांनी मिळून पुन्हा सर्वकाही सुरळीत केले. आज ते आदर्श म्हणून सर्वांसमोर आहेत. जया बच्चन पुण्यात शिकत होत्या त्यावेळी अमिताभ त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ च्या शुटिंगसाठी पुण्यात आले होते. जया बच्चन त्यांना ओळखत होत्या. जया यांच्या मैत्रिणी अमिताभ यांनी लंबू-लंबू म्हणून चिडवायच्या. पण जया यांच्या मनात त्यांची प्रतिमा हरिवंशराय यांचा संस्कारी आणि साधा मुलगा अशी होती. हृषिकेश मुखर्जींनी त्यांच्या ‘गुड्डी’ चित्रपटासाठी जया भादुरी यांच्यासह अमिताभ बच्चन यांना कास्ट केले होते. पण नंतर अमिताभ बच्चन यांना चित्रपटातून बाजुला करण्यात आले. चित्रपटसृष्टीशी संबंध असलेल्यांच्या मते याच प्रकरणानंतर जया यांच्या मनात अमिताभ यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभुती निर्माण झाली होती.
संजीव वेलणकर पुणे