२४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नवे करोना रुग्ण आढळले

करोना संसर्ग रुग्णसंख्येने देशवासियांची चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरपासून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यासोबतच करोना रुग्णसंख्या १ कोटी १४ लाखांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात बुधवारी तब्बल २३ हजार १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले. ‘चाचणी करा, रुग्णशोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला आहे .

महाराष्ट्रात २४ तासांत २३,१७९ नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात बुधवारी २४ तासांत २३,१७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ८४ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबरनंतर राज्यात प्रथमच इतकी मोठी रुग्णवाढ झाली आहे. दिवसभरात मुंबई २३७७, नाशिक शहर १४९०, पुणे शहर २६१२, पिंपरी-चिंचवड १२०६, उर्वरित पुणे जिल्हा ९०६, औरंगाबाद ९७९, नागपूर शहर २६९८, कल्याण-डोंबिवली ६३७, सातारा ३०३, अकोला शहर ३०३, बुलढाणा ५३२, वर्धा ३६० नवे रुग्ण आढळले. सध्या १ लाख ५२ हजार रुग्ण राज्यात उपचार घेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.