आयपीएलवर करोनाचं संकट,
गोलंदाज टी नटराजनला लागण
आयपीएलवर पुन्हा एकदा करोनाचं संकट निर्माण झालं आहे. सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनला करोनाची लागण झाली आहे. आरटीपीसीआर चाचणी केली असता टी नटराजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आयपीएलने दिली आहे. टी नटराजनला करोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसून सध्या इतर सहकाऱ्यांपासून अंतर ठेवत विलगीकरणात आहे. सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्ससोबत सामना होणार आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत खेळलं जात असून हैदराबादचा हा पहिलाचा सामना आहे.
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या
कोकणच्या 272 जणांना कोरोनाची लागण
कोकणची चिंता वाढवणारी बातमी. गणपती उत्सवात गावी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गणेशोत्सवात कोकणात गेलेल्या अनेकांची कोरोना चाचणी करण्यात आली. 272 जणांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. कोरोना चाचणीमध्ये रत्नागिरीत 120 तर सिंधुदुर्गात 152 रुग्ण आढळून आले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या NDA च्या
परीक्षेमध्येच महिलांना परवानगी द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधून केलेल्या भाषणात मुलींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ ८ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये महिलांना एनडीएमध्ये घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचं सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आक्षेप घेतला असून नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या NDA च्या परीक्षेमध्येच महिलांना बसण्याची परवानगी दिली जावी, असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.
भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर
कोविशिल्डबाबत ब्रिटनचा निर्णय मागे
भारतातून कोविशिल्ड लस घेऊन आलेल्यांना विलगीकरणात ठेवण्याचा आणि त्या लसीकरणास मान्यता न देण्याचा ब्रिटन सरकारचा निर्णयात मोठा बदल करण्यात आला आहे. भारत, आफ्रिका, दक्षिण अमेरिका व इतर काही देशांतून लस घेऊन आलेल्यांच्या लसीकरणास मान्यता न देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला होता. आंततराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाल्यानंतर ब्रिटनने निर्बंधामध्ये बदल केले आहेत. भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर, ब्रिटनने निर्णय मागे घेतला आहे, पण एक नवीन सुधारणा करत कोविशील्ड लस घेतलेल्यांना येणास मंजूरी दिली आहे.
राज्यात पुढील ३ दिवसात
मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पुढील ३ दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बुधवारी (२२ सप्टेंबर) राज्यात कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या घाट भागात गुरुवारपर्यंत (२३ सप्टेंबर) मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर, वातावरण अंशतः ढगाळ राहील.
आधार कार्ड संबंधी माहिती
चीनच्या हॅकर्सनी चोरली
सायबर सिक्युरिटी फर्म रेकॉर्ड फ्यूचर इंकच्या नवीन अहवालानुसार, चीन पुरस्कृत हॅकर्सनी आता भारतीय डेटा एजन्सी आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केले आहे. ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, चीनच्या हॅकर्सनी आधारची माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या यूआयडीएआय (UIDAI) आणि देशातील एका प्रमुख माध्यम समूहाची माहिती चोरल्याची घटना समोर आली आहे. मात्र, यूआयडीएआयने सायबर सुरक्षा कंपनीचा हवाला देत हा अहवाल नाकारला आहे.
२४ तासांत मुंबई पोलिसांनी
माफी मागावी : किरीट सोमय्या
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यात अडथळा आणल्याने मुंबईत पोलिसांविरोधातच तक्रार केली आहे. किरीट सोमय्या यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. २४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशा प्रकारे लोकशाही चालवणार आहेत का? असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.
अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा
अपघाती मृत्यू
पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. २० सप्टेंबर रोजी गोव्यातील बागा-कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून ईश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला आहे. पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावरुन जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत जाऊन कोसळली. दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे दोघेही गाडीत अडकले.
भारतात तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी
असण्याची शक्यता : डॉ. गगनदीप कांग
भारतात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. प्रत्येकजण कोरोना कधी संपूर्णपणे नष्ट होणार हा प्रश्न विचारतोय. मात्र यासंदर्भात देशातील टॉप वॅक्सिन एक्सपर्टने दिलेल्या उत्तरामुळे चिंतेत भर पडणार आहे. वॅक्सिन एक्सपर्ट डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग हा ‘एंडेमिसिटी’च्या दिशेने वाटचाल करतोय. डॉ. कांग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा व्हायरस देशातील कधीही न संपणारा आजार बनत चालला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत एकनाथ केदारी यांचे निधन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त दत्तोपंत एकनाथ केदारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी ज्योत्स्ना केदारी, मुलगा अमोल केदारी, सून व नातू असा परिवार आहे. बुधवार पेठेतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कै. तात्यासाहेब गोडसे यांचे ते सहकारी होते. गणेशोत्सव काळात देखावा, विसर्जन रथ यांसह इतरही व्यवस्थांमध्ये ते आवर्जून लक्ष देत असत. विद्यमान अध्यक्ष अशोक गोडसे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले आहे.
महिलेच्या छेडछाड प्रकरणी एकाला 6 महिने 2000 महिलांचे कपडे धुवावे लागणार,कोर्टाची शिक्षा
महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे अनेकजण चिंतेत आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात झंझारपूर येथील स्थानिक कोर्टाने महिलेशी छेडछाड आणि अश्लिल वर्तवणूक करणाऱ्या एका आरोपीला सुनावलेली शिक्षा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.कोर्टाने या आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे धुण्याचे आदेश दिले आहेत. याच अटीवर कोर्टात आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
कोर्टाने या प्रकरणात सुनावणी करताना म्हटलंय की, पुढील ६ महिने आरोपीने गावातील सर्व महिलांचे कपडे धुवावे जेणेकरून त्याच्या मनात महिलांप्रती आदर निर्माण होऊ शकेल. इतकचं नाही तर आरोपीने महिलांचे कपडे धुवून झाल्यानंतर ते प्रेस करून घरोघरी जाऊन ते परत करावेत असंही कोर्टाने सांगितले आहे. न्या. अविनाश कुमार यांनी या प्रकरणात सुनावणी करत २० वर्षीय आरोपी ललन कुमारला फटकारत महिलांचा सन्मान करण्यास सांगितले आहे.
उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील
घटनेत दीडशे टक्क्याने वाढ : मुख्यमंत्री
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटर वॉरचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. राज्यपालांनी साकीनाक्याच्या घटनेवरून दोन दिवसांचं अधिवेशन बोलवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून केली आहे. त्यावर उत्तराखंडमध्ये नेमकं काय चाललं आहे याची आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तुम्ही देवभूमीचे सुपुत्र आहात. उत्तराखंडमध्ये महिला अत्याचारांवरील घटनेत दीडशे टक्क्याने वाढ झाली आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना आरसाच दाखवला आहे.
आमची किडनी विका,
जळगांवचे रस्ते दुरुस्त करा
आमची किडनी विका, पण चाळणी झालेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा, अशी आर्त विनवणी जळगावकरांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली. दुसरीकडे नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी कोर्टाची पायरी चढायची तयारी सुरू केली आहे.
SD social media
9850 60 3590