दहशतवाद्यांचा आता ड्रोन स्‍ट्राईक ?

जम्‍मू-कश्‍मीरमधील भारताच्या हवाई दलाच्या (आयएएफ) छावणीवर ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची काळजी वाढली आहे. भारतात पहिल्यांदाच दहशतवाद्यांनी ड्रोनचा उपयोग केलाय. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यालाही या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे हे स्पष्ट केलंय. जम्‍मूमधील हा ड्रोन हल्ला करण्यात आला तो खूप लहान होता. त्यामुळे आगामी काळात अशा हल्ल्यांचा धोका वाढलाय. आगामी काळ ड्रोन वॉरफेयर ठरण्याची शक्यता आहे.

भारताशिवाय अमेरिका, इस्राईल, चीन, इराण, इटली, पाकिस्‍तान, तुर्की आणि पोलंडने 2019 पर्यंत ऑपरेशनल यूएव्ही म्हणजेच अनमॅन एरियल व्‍हेईकल तयार केले होते. ड्रोन हल्ल्यात कोणत्याही यूएव्हीच्या मदतीने बॉम्ब टाकला जातो, मिसाईल दागलं जातं, टारगेटला पाडणं आणि इतर अशा कामांसाठी उपयोग होतो. ड्रोन हल्ल्यात यूएव्हीला हल्ल्याच्या ठिकाणापासून दूर दुसऱ्या ठिकाणी राहूनही हल्ला करता येतो.

ड्रोन हल्ला काय असतो हे जगाला सर्वात आधी अमेरिकेनेच दाखवून दिलं. अमेरिकेने अफगानिस्‍तानपासून पाकिस्‍तान, सीरिया, इराक, सोमालिया आणि यमनमध्ये त्याचा उपयोग केलाय. तुर्की आणि अजरबेजान यांनी मात्र मोठ्या प्रमाणात ड्रोन युद्धं केली. 2020 मध्ये तुर्कीच्या बनवलेल्या यूएवीला स्‍फोटकांनी भरण्यात आलं.

लिबियात या ड्रोन हल्ल्यांनी सैन्याला लक्ष्य करण्यात आलं होतं. मार्च 2021 मध्ये संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्या लिबियावरील अहवालात कोणत्याही कमांडशिवाय करण्यात येणाऱ्या ड्रोन हल्ल्याचा उल्लेख केला होता. ओबामाच्या काळात सर्वाधिक ड्रोन हल्ले करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.