शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे.“राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. या आंदोलनात कोणतीही हिंसा नव्हती. हा संप त्या सगळ्यांनी यशस्वी करून दाखवला. मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती. शासनाने यासंदर्भात गेल्या सात दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली आहेत. आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलंय की याबाबत ते गंभीर विचार करत आहेत. यासंदर्भात सरकारनं समिती नेमली आहे. ती समिती आधी आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक नवा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार प्रिन्सिपल म्हणून जुन्या पेन्शन योजनेची संपकऱ्यांची मागणी स्वीकारण्यात आली. जुनी आणि नवी पेन्शन योजना यात मोठं अंतर होतं. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात अंतर राहणार नाही अशी भूमिका शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात कळवली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ती निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल”, अशी माहिती संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना दिली.
राज्यात टाईमपास सरकार; पंचनामे नाहीत आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाईही नाही !: नाना पटोले
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत आणि मदतही जाहीर केली जात नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे टाईमपास सरकार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
स्मशानात अवतरला स्वर्ग ! बर्थ डे पार्टी ते प्री वेडिंग शूटसाठी होतीय सर्वांची गर्दी
स्माशानाचं नाव ऐकताच अनेकांना भीती वाटते. स्माशानात जाण्याची कुणाचीही इच्छा नसते.गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसामधील स्मशान वेगळं आहे. हे स्मशान आता चक्क पिकनिक स्पॉट बनलं आहे.डिसामध्ये बनास नदीच्या काठावर 14 एकर विस्तीर्ण परिसरात हे स्मशान बनवण्यात आलं आहे.हे स्मशान बनवण्यासाठी 5 ते 7 कोटी खर्च आला असून इथं मुलांच्या खेळण्यापासून अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.या स्मशानात लोकं अत्यंसंस्काराबरोबरच वाढदिवस आणि प्री वेडिंग शूटही करायला येतात.येथील भिंतीवर वेगवेगळे पौराणिक प्रसंग दाखवले आहेत.त्याचबरोबर अनेक देवतांच्या मूर्तींचं दर्शनही इथं घेण्याची संधी आहे. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मुद्दाम अनेक जण स्मशानात येत आहेत.स्मशानातील अंत्यसंस्काराची जागा आधुनिक पद्धतीनं बनवण्यात आली असून मुलांसाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे.वरिष्ठ नागरिकांसाठी प्रार्थनागृह, पुस्तकालय त्याचबरोबर पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय देखील इथं करण्यात आली आहे.फक्त 1 रुपयाच्या टोकनमध्ये इथं कोणत्याही व्यक्तीवर अंत्यसंस्कार करता येतात.
रेल्वेचं खासगीकरण होणार का?
भारतीय रेल्वे संध्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमुळे सुसाट धावत आहे. आगामी काही वर्षात भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार का अशी चर्चा रंगली होती. पण, ‘रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही, रेल्वे इतकी गुंतागुंतीची आहे, रेल्वेही भारताची सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. आमचा कोणताही हेतू नाही, स्पष्टपणे पण सांगतो रेल्वेचे खासगीकरण होणार नाही’ असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.रेल्वेच्या खाजगीकरणाच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, ‘ खासगीकरण करणे या शंका जुन्या झाल्या आहेत, पीयूष गोयल म्हणाले होते की, खाजगीकरण होणार नाही, रेल्वे इतकी गुंतागुंतीची आहे, मुळात रेल्वे एक सामाजिक बांधिलकी आहे, ती सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे. कोणताही हेतू नाही, स्पष्टपणे सांगतो रेल्वेचे खासगीकरण होणार नाही’
अनिल जयसिंघानीला अखेर अटक, गुजरातमधून घेतलं ताब्यात!
मोठी बातमी समोर येत आहे. अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे.अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. तिच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. तर अनिल जयसिंघानी हा फरार होता. अखेर त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
आम्हाला फक्त ‘त्यांचा’ पत्ता सांगा; अंनिसचे बागेश्वर बाबांना नवे चॅलेंज, बाबा आव्हान स्विकारणार?
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मुंबईतल्या मीरा रोड परिसरात भव्य असा दरबार पार पडला. या दरबाराच्या आयोजनापासून सुरू झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात चोरट्यांनी धुमाकूळ घालत महिलांचे मंगळसूत्र, गळ्यातील चेन याशिवाय इतर दागिने लंपास केले होते.स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 36 महिलांनी मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. धीरेंद्र शास्त्रींचे अनुयायी मोठ्या संख्येने दरबारात आले होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेला दरबार रात्री 9 वाजता संपला.बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात चोरी झाल्याची घटना समोर आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मृल समिती अंनिसने हाच मुद्दा पकडून पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात काही भक्तांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार आहे. आता या बाबांनी पोलिसांना चोराचे पत्ते सांगावेत असं अंनिसने म्हटलं आहे.
शाहिरांची वाणी पुन्हा घुमणार; राज ठाकरेंच्या हस्ते केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र्र शाहीर’ चा दमदार टीझर रिलीज
मराठी चित्रपटसृष्टीला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. एक सो एक चांगल्या कलाकृती आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मराठी प्रेक्षकही या चित्रपटांना भरभरून दाद देत आहे. अशीच एक आगळीवेगळी आणि ऐतिहासिक कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता या चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित झाला आहे.
आईची सलग तीन वर्ष हॅट्रीक..! पुरस्कार मिळताच अरुंधती फेम मधुराणी पहिल्यांदाच मनापासून झाली व्यक्त
आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांत लोकप्रिय आहे. प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. मालिकेचं कथानक अरुंधती भोवताली फिरताना दिसते. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले साकारताना दिसते. मधुराणीला या भूमिकेनं आई म्हणून एक वेगळी ओळख दिलीच शिवाय ती यामुळे महाराष्ट्राच्या घराघारत पोहचली. आज तिला अरुंधती, आई अशी एक वेगळी ओळख मिळाली आहे. याच भूमिकेसाठी मागील दोन वर्षे आणि यंदा असा एकूण तीनवेळा पुरस्कार मिळाला आहे. मधुराणीनं सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल आई कुठे काय करते संपूर्ण टीमचं व प्रेक्षकांचं आभार मानले आहेत.आई कुठे काय करते मालिकेतील भूमिकेसाठी मधुराणीला स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात मागील दोन वर्षात सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा तर दुसऱ्या वर्षात सर्वोत्कृष्ट आई आणि तिसऱ्या वर्षात महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. सध्या सगळीकडं स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याची चलती आहे. या पुरस्कार सोहळ्यात मधुराणीला यंदाचा महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. याबद्दल मधुराणीनं तिच्या इन्स्टाग्रामला एक पोस्ट लिहिली आहे.
WPL 2023 : मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्लीनेही मिळवलं प्ले ऑफमध्ये स्थान
सध्या भारतात महिला प्रीमियर लीग सुरु असून यात दररोज रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. महिला आयपीएल आता स्पर्धेच्या शेवटाकडे वाटचाल करीत असून 26 मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार. महिला आयपीएलच्या पहिल्या वाहिल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी संघांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे गरजेचे आहे. तेव्हा आता मुंबई पाठोपाठ दिल्लीच्या संघाने स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये धडक दिली आहे.
महिला आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ 6 पैकी 5 सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे. यासह स्पर्धेत 10 पॉईंट्स मिळवून मुंबईचा संघ महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला. त्यानंतर आज 8 पॉईंट्सची आघाडी घेऊन दिल्ली कॅपिटल्सचा संघ महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जाणारा दुसरा संघ ठरला आहे.
जागतिक बँकांवर आर्थिक संकट! भारतातील IT सेक्टरला मोठा फटका?
जागतिक बँकिंग संकटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि त्यापाठोपाठ क्रेडिट सुईस बँकही संकटात सापडली आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रावरच्या संकटाचा परिणाम आता इतरही देशांमध्ये जाणवू लागला आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांमधल्या बँका आर्थिक संकटात सापडल्याचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होत आहे.भारतीय आयटी कंपन्यांचं मोठं मार्केट अमेरिका हे आहे. आयटी कंपन्या जगातल्या मोठ्या बँका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या सेवा देतात. त्यामुळे या बँकांवर आर्थिक संकट कोसळलं, तर आयटी कंपन्यांना त्यांच्याकडून नवं काम मिळणार नाही व असलेल्या कामाचे दरही कमी होतील. याचा परिणाम आयटी कंपन्यांच्या अर्थव्यवहारावर होईल, हीच भीती सध्या शेअर मार्केटमध्ये जाणवते आहे. गेल्या 6 ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी आयटी इंडेक्स साडेपाच टक्क्यांनी घसरला आहे.
‘चोरमंडळ’ वक्तव्यावरून संजय राऊतांचं विधिमंडळाला उत्तर, नोटीसलाच दिलं आव्हान
विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्यानंतर संजय राऊत यांना नोटीस देण्यात आली होती. या नोटीसला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. या उत्तरामध्ये संजय राऊत यांनी नोटीसलाच आव्हान दिलं आहे. खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग समितीविषयी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. हक्कभंग समितीवरच संजय राऊत यांनी आक्षेप घेतले आहेत.सन्मानिय विधानसभा सदस्य अतुल भातखळकर व भरत गोगावले यांनी माझ्याविरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार तसेच अवमानाच्या सूचनेवर उत्तर देण्यासाठी आपण मुदत वाढवून दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
SD Social Media
9850 60 3590