मुंबईत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला, मॅार्निंग वॅाकला आले असता स्टम्पने मारहाण

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये मॅार्निंग वॅाकला आले असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

अज्ञात लोकांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली. तर हा हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात संदीप देशपांडे यांच्या हाताला जबर मार लागल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसेसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.

राज ठाकरेंचे निकटवर्तीय – 

1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.