रॅपर एमसी स्टॕन सुरुवातीपासूनच तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्याच्या लोकप्रियतेत अफाट वाढ झाली आहे. एमसीने बिग बॉसची ट्रॉफी जिंकत आपली फॅन फॉलोईंग काय आहे हे दाखवून दिलं आहे. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. घरातून बाहेर येताच आता स्टॅनकडे विविध प्रोजेक्ट्सची रंग लागल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, एमसी स्टॅन शाहरुख खानच्या चित्रपटात दिसणार आहे.
बिग बॉसच्या घरात असताना एमसी स्टॅनला चांगलीच पसंती मिळाली होती. दरम्यान घरातून बाहेर आल्यांनतर एमसी स्टॅनने इन्स्टा लाईव्ह केलं त्यामध्ये सर्वाधिक लोक जॉईन झाले होते. त्यामुळेच एमसी स्टॅनने सर्व सेलेब्रेटींना मागे टाकत इन्स्टा लाईव्हचा नवा रेकॉर्ड केला आहे. दरम्यान आता बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात एमसी स्टॅन झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवानच्या मेकर्सनी एमसी स्टॅनला सिनेमासाठी अप्रोच केलं आहे.