बुधवारी राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 67 हजार 214 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.
राज्यात काल दिवसभरात 985 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे पुणे महापालिकेत झाले आहेत. पुणे महापालिकेत दिवसभरात 117 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापाठोपाठ ठाणे आणि मुंबई महापालिकेत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर दुसरीकडे गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही सातत्याने वाढत आहे. काल राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे वाढते कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आलीय. त्यामुळे कोरोनाचं हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे.
राज्यात मृत्यू झालेली ठिकाणं
पुणे पालिका – 117
ठाणे पालिका – 92
मुंबई पालिका – 78
औरंगाबाद – 80
नागपूर पालिका – 69
नंदुरबार – 43
राज्यात काल 63,309 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44,73,394 झाली आहे. राज्यात काल 62,181 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आतापर्यंत एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.4 % एवढे झाले आहे. तर काल राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 67 हजार 214 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे.