मोठी पर्यावरण हानी झालेल्या ५० विभागांत महाराष्ट्र; ; भारतातील नऊ राज्यांचा समावेश

हवामान बदलामुळे जगभरातच पर्यावरणाची हानी होत आहे. या पर्यावरण हानीमध्ये जगभरातील जे ५० विभाग आघाडीवर आहेत, त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब यासह भारतातील नऊ राज्यांचा समावेश आहे. सोमवारी याबाबतचा अहवाल प्रकाशित झाला. हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या ‘क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह’ने हा अभ्यास केला आहे.

या प्रदेशांची तुलना पूर, जंगलातील आग, उष्णतेची लाट आणि समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीमुळे इमारती आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या मॉडेलच्या अंदाजानुसार केली आहे. चीन आणि भारतावर विशेष लक्ष केंद्रित करतानाच या प्रदेशातील २०५० मध्ये अव्वल २०० पैकी अर्ध्याहून अधिक (११४) जोखीम असलेल्या प्रांतांच्या यादीत आशिया खंड आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. या अभ्यासानुसार, २०५० मधील अग्रणी ५० सर्वाधिक जोखीम असलेली राज्ये आणि प्रांतांपैकी ८० टक्के चीन, अमेरिका आणि भारतातील आहेत. चीननंतर, भारतामध्ये सर्वोच्च जोखमीच्या यादीत बिहार २२व्या क्रमांकावर, उत्तर प्रदेश २५, आसाम २८, राजस्थान ३२, तामिळनाडू ३६, महाराष्ट्र ३८, गुजरात ४८, पंजाब ५० आणि केरळ ५२व्या क्रमांकावर आहे. आसाम राज्यात १९९०च्या तुलनेत २०५० पर्यंत बदलत्या हवामानामुळे पर्यावरणाचा धोका ३३० टक्क्याहून अधिक पटीने राहील, असे या अभ्यासात नमूद आहे.

जून आणि ऑगस्ट २०२२ दरम्यान आलेल्या विनाशकारी पुरामुळे पाकिस्तानच्या ३० टक्के क्षेत्रावर परिणाम झाला आणि सिंध प्रांतातील नऊ लाखांहून अधिक घरांचे अंशत: किंवा पूर्ण नुकसान झाले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडा या आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाच्या राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसेल. जगातील प्रत्येक राज्य, प्रांत आणि प्रदेश यांची तुलना करून, केवळ तयार केलेल्या वातावरणावर केंद्रित भौतिक हवामान जोखीम विश्लेषणाची ही पहिलीच वेळ आहे.

आशियाला हवामान बदलामुळे पर्यावरण नुकसानीचा सर्वात मोठा फटका बसला आहे. हे आजपर्यंतचे भौतिक हवामान जोखमीचे सर्वात अत्याधुनिक जागतिक विश्लेषण आहे, जे आम्ही यापूर्वी पाहिलेले नाही.

– रोहन हॅमडेन, मुख्य कार्यकारी अधिकारी, क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.