शनिदेव 5 जून रोजी कुंभ राशीत वक्री होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनिदेवाच्या अशुभ प्रभावाची भीती सर्वांनाच असते. जेव्हा शनि एखाद्या राशीत अशुभ असतो तेव्हा माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण, असं नाही की शनिदेव केवळ अशुभ फळ देतात. शनिदेव शुभ फळदेखील देतात. जेव्हा एखाद्या राशीवर शनिदेव शुभ असतो तेव्हा माणसाचे निद्रिस्त भाग्यही जागे होते. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांची वक्री आणि सरळ चाल खूप महत्त्वाचे मानले जातात. कुंभ राशीत शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे काही राशींना फायदा होणार आहे. कुंभ राशीत शनीच्या वक्रीमुळे कोणत्या राशींचे शुभ दिवस सुरू होतील ते जाणून घेऊया-
मेष रास
तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
या दरम्यान तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल.
नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.
आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
तब्येत सुधारेल.
वैवाहिक जीवन सुखकर राहील.
पैसा आणि नफा मिळेल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत राहील.
कन्या रास
चांगली बातमी मिळेल.
या दरम्यान कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल.
नोकरीच्या शोधात असलेले लोकांना चांगले परिणाम मिळवू शकतात.
आत्मविश्वास वाढेल.
वैवाहिक जीवन सुखकर राहील.
पैसा लाभदायक ठरेल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत राहील.
धनु रास
पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल.
समाजात मान-सन्मान वाढेल.
पद-प्रतिष्ठा वाढेल.
जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
व्यवहारासाठी चांगला काळ.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)