काश्मीरमध्ये परप्रांतीयांना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे. 26 दिवसांत टार्गेट किलिंगच्या 10 घटना घडल्या असून आता दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कामगारांवर ग्रेनेड फेकले. यामध्ये दोन मजूर जखमी झाले आहेत.
या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मजूर जखमी झाल्याची माहिती सुरुवातीला समोर येत होती. मात्र पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट केलं आहे. सिलिंडरचा स्फोट झाला नाही.जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानच्या आगलार झैनापोरा भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला, ज्यामध्ये दोन प्रवासी मजूर जखमी झाले. परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे.
या स्फोटात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट होताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास केला. दहशतवाद्यांनी परप्रांतीयांवर ग्रेनेडनं हल्ला केल्याचं तपासात समोर आलं आहे. यामध्ये दोन मजूर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.