आज दि.३ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अमूल दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपयांची वाढ

गुजरात डेअरी को-ऑपरेटिव्ह अमूलने दुधाच्या दरात वाढ करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दुधाचे दर प्रति लिटर मागे तीन रुपयांनी वाढले आहेत आणि हे नवीन दर तत्काळ लागू करण्यात आले आहेत.

नवे दर लागू झाल्याने अमूल गोल्ड दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, अमूल ताजा दुधाची किंमत ५४ रुपये प्रति लिटर, अमूल गायीच्या दुधाची किंमत ४६ रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रतिलिटर झाली आहे.

अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अदाणी उद्योग समूहाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अजूनही थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. Hindenburg Research नं अदाणी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवल्यानंतर अदाणी उद्योग समूहाची पत ढासळतानाच दिसत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदाणी उद्योग समूहाला एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. हा आकडा त्यांच्या एकूण संपत्ती मूल्याच्या जवळपास ५० टक्के इतका आहे!

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील चार कार्सचा अपघात, घटनास्थळी बचावकार्य सुरू

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातल्या कार्सचा अपघात झाला आहे. या कार्समध्ये चार कारचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. अखिलेश यादव हरपालपूर या बैठापूरमध्ये एका लग्न समारंभासाठी गेले होते. त्यावेळी खेमीपूर गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेनंतर काही व्हिडिओही समोर आले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु झालं आहे. या ठिकाणी अँब्युलन्सही आल्या आहेत.

पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; BSF च्या हल्ल्यात कोसळलं!

अनेकदा शस्त्रसंधी आणि चर्चांच्या फेऱ्या होऊनही पाकिस्तानकडून अजूनही सीमाभागात आगळीक चालूच असते. आज एक पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीएसएफ अर्थात सीमा सुरशक्षा दलाच्या जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे ड्रोन वेळीच खाली पाडण्यात यश आलं आहे. यासंदर्भात पीटीआयनं ट्वीट करून माहिती दिली आहे.

महिला आयपीएलचं बिगुल वाजलं! मुंबईच्या मैदानांवर रंगणार सामने, अंबानी vs अदानी कोणता संघ जिंकणार?

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा लिलाव सुपरहिट ठरणार आहे. प्रत्यक्षात, या लीगसाठी उपलब्ध असलेल्या ९० स्लॉटसाठी सुमारे १००० खेळाडूंनी नोंदणीसाठी स्वारस्य दाखवले आहे. महिला खेळाडूंमध्ये या लीगसाठी प्रचंड उत्साह आहे. न्यूज १८च्या वृत्तात, एका सूत्राने सांगितले की, ‘महिला प्रीमियर लीगसाठी प्रचंड रस आहे. आतापर्यंत १००० खेळाडूंनी लिलावासाठी साइन अप केले आहे. या लिलावात भारतासोबतच परदेशी खेळाडूही मोठी उत्सुकता दाखवत आहेत. त्याच दरम्यान महिला आयपीएलचं बिगुल वाजलं आहे. मुंबईच्या मैदानावर हे सर्व सामने होणार आहेत.मुकेश अंबानीच्या मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. महिला प्रीमिअर लीगसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्काच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. १३ फेब्रुवारीला WPL Auction होणार आहे. त्याआधी आज Cricbuzz ने महिला प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर केले.

राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस; शासनाकडून परिपत्रक जारी

शालेय वयात मुलांच्या जडणघडणीत आजी आजोबांची महत्वाची भूमिका असते. मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. रविवार १० सप्टेंबर रोजी असलेला हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणार आहे. काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन न करता आल्यास शाळेकडून आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.

सांगली : वाऱ्याने द्राक्षबाग भुईसपाट, पंधरा लाखाचे नुकसान

कवठेमहांकाळ तालुक्यात खरशिंग येथे काढणीला आलेली दोन एकर द्राक्षबाग जोरदार वार्‍यामुळे शुक्रवारी भुईसपाट झाली. महादेव जगताप असे  या शेतकर्‍याचे नाव असून काढणीला आलेली बाग भुईसपाट झाल्याने त्याला रडू अनावर झाले. यामुळे सुमारे १५ लाखाचे नुकसान झाले.

दंडोबा डोंगररांगाच्या परिसरात जगताप यांची द्राक्षबाग असून बागेतील माल  तयार झाला आहे. येत्या काही दिवसात बागेतील माल निर्यात करण्याची काढणीची तयारीही केली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वार्‍याने बागेच्या आत शिरकाव केला व बघता बघता बाग तयार द्राक्षासह भुईसपाट झाली.

नागपूरमध्ये भाजपला तिसरा धक्का, बालेकिल्ल्याचा बुरूज का ढासळतोय?

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार पाडलं, पण आता महाविकासआघाडीसमोर त्यांना प्रभाव पाडण्यात अपयश आलं आहे. विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजप-शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे, तर महाविकासआघाडीचा विजय झालाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड समजला जाणाऱ्या नागपूरमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरएसएसचं मुख्यालयही नागपूरमध्येच आहे, त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे.

4 किलो सोन्याचा शर्ट घालायचा, नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या घोटाळ्यात अटक

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोल्डमॅन पंकज पारख यांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

नाशिकच्या येवल्यातील उद्योजक आणि राजकारणी अशी पंकज पारख यांची ओळख आहे. त्यांनी 4 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला 1.30 कोटींचा शर्ट घातल्याने पंकज पारख यांच्या शर्टाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. यानंतर आता पंकज पार्क संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप पंकज पारख यांच्यावर आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पंकज पारख यांना अटक केली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.