आपल्या अनेकदा वेगवेगळ्या कामासाठी पैशांची गरज पडते, ज्यासाठी आपण बँकेकडे जाऊन कर्ज घेतो. परंतु बऱ्याचदा काय होतं की, या ना त्या कारणावरुन बँक ग्राहकांना कर्ज द्यायला नाकारते. यामध्ये बँक ग्राहकांना काही वेळेला अशी काही कारणं देते की, ग्राहकांना हे कर्ज मिळवणे फार कठीण होते. त्यामुळे बऱ्याचदा लोकं वेगवेगळ्या पर्यांयांकडे वळतात. मग ते सावकार किंवा इतर लोकांकडून जास्त टक्के व्याजदरावरती कर्ज घेतात. परंतु आता तुमचं हे टेन्शन जवळ-जवळ संपलं कारण तुम्ही आत झटपट कर्ज घेऊ शकणार आहात.
तुम्हाला अवघ्या काही मिनिटात झटपट कर्ज मिळू शकतं आणि ते देखील व्हॉट्सअॅपवरून. ज्यामुळे आता तुम्हाला बँकांमध्ये खेटे बोलायची आणि बँक मॅनेजरला मस्का पॉलिशिंग करण्याची काहीच गरज नाही. अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला व्हॉट्सअॅपवरुन 10 लाख रुपयांचं कर्ज मिळू शकतं.
बिझनेस करू इच्छिणाऱ्यांसाठी NBFC IIFL या बिगर बँकिंग वित्तीय कंपनीनं ही सेवा उपलब्ध करून दिलीय. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांत 10 लाख रुपयांपर्यंतचं लोन ही कंपनी ग्राहकांना देणार आहे.
जाणून घ्या
• यासाठी 9019702184 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर HI असा मेसेज करा
• त्यानंतर तुमच्या बिझनेसशी संबंधित माहिती आणि कागदपत्रे मागितली जातील
• ती माहिती दिल्यानंतर तुमचा सीबिल स्कोअर तपासला जाईल
• त्यानंतर तुमच्या पात्रतेनुसार बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल