पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे. कारण गेल्या वर्षी जो लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता,” असं संजय निरुपम म्हणाले आहेत.
“सव्वा तीन कोटी लोक लॉकडाउनमुळे गरीब झाल्याचा एक रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन आणून लोकांना त्रास देऊ नका,” असं सांगताना संजय निरुपम यांनी निर्बंध लावण्याला समर्थन दर्शवलं आहे.
“सावधगिरी बाळगणे आणि लसीकरण हे दोन पर्याय आहेत. गेल्या वर्षी लसीकरण नव्हतं. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु करुन जास्तीत जास्त लसीकरण केलं पाहिजे. मिशन टेस्टिंग बकवास आयडिया आहे. तुम्हीच चित्रपटगृहाच्या बाहेर आणि मॉलच्या बाहेर जे लोक येत आहेत त्यांना पकडता आणि जबरदस्तीने ट्रेस करता. त्यांच्याकडून २५० रुपये घेतले जातात. त्याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहिजे. पण लॉकडाउन नको,” असं स्पष्ट मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे.