शरद पवारांच्या पोटात का दुखू लागले : नवीन कुमार

सचिन वाझेने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है”, असं ट्विट नवीन कुमार यांनी केलं. याशिवाय, “पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतंय” असंही कुमार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं.

पवारांच्या प्रकतीबाबतचं वृत्त समजताच राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शरद पवारांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या. यामध्ये लता मंगेशकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा अनेक दिग्गजांचा समावेश होता. पवारांनीही ट्विट करत प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. पण, अशात दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवारांवर टीका केली.
त्यांनी पवारांच्या पोटदुखीच्या त्रासाचा संबंध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयएने अटक केलेल्या सचिन वाझेंसोबत जोडला. अटक केल्यापासून वाझे दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. यावरुन बोलताना जिंदल यांनी पवारांवर निशाणा साधला. “

दरम्यान, शरद पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.