औषधांबरोबर हे उपायही महत्वाचे
कॉलरा हा बॅक्टेरीयामुळे होणारा आजार आहे. प्रदूषित पाणी आणि जेवणामधून विब्रिओ नावाचा बॅक्टेरिया शरीरात गेल्यामुळे हा रोग होतो. या आजारामुळे लूज मोशन्स होण्याने शरीरातील पाण्याची पातळी खालावते. यामुळे शरीर डिहायड्र होतं. योग्य वेळी वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही तिथे कॉलरा होण्याचा धोका जास्त असतो. कॉलरा झालेल्या व्यक्तीला उलट्या आणि लूज मोशन्स होतात. त्यामुळे थकवा येणं, पोटदुखी अशी लक्षणं दिसायला लागतात. काही घरगुती उपचार पद्धतींनी कॉलरापासून बचाव केला जाऊ शकतो.
1. कॉलराच्या रुग्णाच्या शरीरात पाण्याची पातळी कमी होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं. शरीर हायड्रेट राहणं आवश्यक आहे. भरपूर पाणी पिण्याने कॉलरातून बरं होण्यात मदत होते.
2. 3 लिटर पाण्यात काही लवंगा टाका. हे पाणी उकळवा. हे मिश्रण दर काही तासांनी प्या. कॉलरासाठी हा एक उत्तम घरगुती उपचार आहे.
3. पाणी आणि तुळशीच्या पानांचं मिश्रण पिण्याने कोलराही बरा होतो. याशिवाय ताकात थोडी साखर ,मीठ आणि जिरे घालून पिणं कॉलरामध्ये फायदेशीर आहे.
4. काकडीची पानं, नारळ पाणी किंवा लिंबाचा रस घालून प्या. दररोज किमान एक ग्लास पिण्याने फायदा होतो.
5. कांदे बारीक करून त्यात काळी मिरी पावडर घाला आणि त्याचा अर्क नियमित प्या. कॉलरासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
या खबरदारी घ्या
कॉलराच्या रूग्णांनी आहाराकडे लक्ष द्यावं. सुरवातीला द्रवपदार्थच घ्यावेत. तसच रुग्णाला दिवसभर भरपूर पाणी,सोडा आणि नारळ पाणी प्यावं. लक्षात ठेवा की एकाच वेळी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्यास उलट्या होऊ शकतात, म्हणून थोड्या प्रमाणात घेतलं पाहिजे. बर्फाचे तुकडे चाखायला देऊ शकता. पूर्ण बरं वाटेपर्यंत पचायला जड आणि न शिजविलेले पदार्थ आणि भाज्या पूर्णपणे टाळल्या पाहिजेत.