राज्य सरकारमध्ये एसटीचं विलीनीकरण करण्यात यावं म्हणून एसटीच्या (ST) कर्मचा-यांचा अनेक महिन्यांपासून संप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संप अनेक महिन्यांपासून सुरू असून त्यावर राज्य सरकारने अद्याप तोडगा काढत नसल्याने अनेक कर्मचा-यांनी पुन्हा कामावर रूजू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत अनेक कर्मचा-यांनी कुटुंबियावर उपास मारीची वेळ आल्याने आत्महत्या देखील केली त्यामुळे या महाविकास आघाडीच्या सरकारला केव्हा जाग येईल अशी विरोधकांनी टीका देखील केली आहे.
एसटीच्या संपाबाबत एक गोपणीय पत्र व्हायरल झालं असून ते मोबाईलवरती आणि सोशल मीडियावरती फिरत असून त्यामध्ये कर्मचा-यांना गोड बोलून कामावर घेतलं जात आहे. त्याचबरोबर मी संपात सहभागी होतो असं जबरदस्तीने लिहून देखील घेतलं जात आहे. त्यामुळे नेमकं हे राज्य सरकारचं पत्र आहे की अन्य कुणी तयार करून ते फिरवत आहे, याबाबत कुठलीही स्पष्टता झालेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्या पत्राची एसटी कर्मचा-यांमध्ये अधिक चर्चा आहे.
आत्तापर्यंत एसटीच्या संपाचा मुद्दा अधिक वादग्रस्त ठरला असल्याचे पाहायला मिळाला आहे. त्यामुळे अधिक कर्मचा-यांना बडतर्फ करू असं राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर वैतागलेल्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या. तसेच आझाद मैदानात राज्यात अनेक कर्मचा-यांनी आंदोलन देखील केलं आहे. पण सध्याच्या पत्रानं अधिक कर्मचा-यांमध्ये अधिक खळबळ माजली असल्याचे पाहायला मिळाले आहे.