रयत क्रांती संघटेनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर ट्विट द्वारे टीका केली आहे. शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील कार्यक्रमात बोलताना काही जण निवडणूक होण्यापूर्वीचं मी येणार मी येणार असं म्हणत होते. मात्र, आम्ही येऊ दिलं नाही असं म्हटलं होतं. पवार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता टोला लगावला होता. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. त्या यात्रेची टॅगलाईन मी पुन्हा येईन ही होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की असल्याचं ट्विट करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सदाभाऊ खोत यांच्या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.
रशिया आणि युक्रेन मधील संघर्ष सुरु आहे. तेथील विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आहे, जेव्हा डॉक्टर होण्याची वेळ येते तेव्हा लोक युक्रेन सारख्या देशात जातात तेथे आपली हजारो मुलं आहेत. आठ आठ दिवसांपासून ते भुयारात बसलेत, बाहेर पडता येत नाही. केंद्र सरकारने काही पावलं टाकली आहेत तेथे आम्ही सोबत आहोत तेथे आम्ही राजकारण आणणार नाहीत. तेथील मुलांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. ज्या वेळेस युद्ध थांबेल तेव्हा मोठ्या संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागेल ते म्हणजे महागाई आहे. त्या संकटाला तोंड आपल्याला द्यायच आहे या संकटाला महाराष्ट्र सरकार तोंड देईल ही मला खात्री आहे, असं शरद पवार म्हणाले. संकट येईल तेव्हा राजकारण आणायचं नाही, असंही ते म्हणाले.
संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले.