आरसीबीच्या बॉलर्स समोर दिल्लीच लोटांगण, RCB चा ‘विराट’ विजय
आयपीएल 2023 मध्ये 19 सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा पराभव केला आहे. चिन्नस्वामी स्टेडीयमवर खेळवलेल्या सामन्यात आरसीबीने दिल्लीवर 23 धावांनी विजय मिळवला असून ,यंदाच्या आयपीएलमधील त्यांचा दुसरा सामना जिंकला आहे.
एकच प्याला जिवावर, बिहारमध्ये पुन्हा दारूकांड, 6 जणांचा मृत्यू
बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारूकांड घडले आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल प्रशासनाने दुजोरा दिला आहे. 10 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली आहे. सर्वांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
‘फडणवीस साहेब काय जादू करतील हे सांगता येत नाही’; भाजप नेत्याचं मोठं विधान
“फडणवीस जादूगार आहेत, ते कधी काय करतील सांगता येत नाही. त्यांनी पूर्वीही अशीच जादू केली आहे”, अशी स्तुतिस्तुमने भाजपचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उधळली आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. यावरुन विचारले असता विखे पाटील यांनी भविष्यात काहीही होऊ शकते, असं म्हटलं आहे. याचवेळी महाविकास आघीडीवरही त्यांनी तोंडसुख घेतलं. शहरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘हा 10 हजार कोटींचा घोटाळा’, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप
कांजुरमार्गेमधील मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहे. कांजुरमार्गमधील 15 हेक्टर जागा देत असताना कुणाला अनुदान देणार आहात? या 44 हेक्टरमधील 15 हेक्टर जागा मेट्रोला वापरणार आहे, तर उरलेली जागा कुणाला दिली जाणार आहे, बिल्डरांना दिली जाणार आहे, यावर नक्की काय होणार आहे, हा एक मोठा घोटाळा आहे, यावर मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कांजुरमार्गमधील जागेबद्दल नवीन खुलासा केला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
‘द कपिल शर्मा शो’लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ हा आहे. या शो मधून दर आठवड्याला प्रेक्षकांना हास्याचा डोस मिळतो. काही दिवसांपूर्वीच या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली दहा वर्ष सुरु असलेल्या या शो मधून आजवर अनेक जणांनी एक्झिट घेतली आहे. पण प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे हा शो आजवर चालू होता. बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे बडे स्टार्स कपिलच्या या शो मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. आता कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. ‘द कपिल शर्मा शो’ लव्करकच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला वर्षभरात २ लाख ८२ हजार ६१२ पर्यटकांची भेट
करोना संक्रमण काळानंतर पर्यटकांचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पर्यटनासाठी येण्याचा ओढा वाढला आहे. १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत २ लाख ८२ हजार ६१२ पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. यात ५ हजार १३ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक येथे येत असल्याने २८६ कोटी रुपयांची मंजुर झालेली टायगर सफारीची कामे लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना दिले आहे.
बोरघाटातील अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसचा रायगडमधील खोपोली येथील बोरघाटात आज (१५ एप्रिल) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १३ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहेत. या अपघातनंतर मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींसाठी राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली. आता केंद्र सरकारनेही नुकसानभरपाई जाहीर केली आहे. त्यानुसार, केंद्र सरकार पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत मृतांच्या नातेवाईंकासाठी २ लाख आणि जखमींसाठी ५० हजारांची मदत देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भातील ट्वीट केलं आहे.
पॅसिफिक महासागराला लागली गळती; ९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होण्याची वैज्ञानिकांना भीती!
पॅसिफिक महासागराच्या तळाशी ९६५ किमी लांबीच्या फॉल्ट लाइनमध्ये एक छिद्र आढळलं आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीवर ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. ‘पायथियास ओएसिस’ नावाच्या छिद्रातून ४ किमी खाली अडकलेला द्रव समुद्रात सोडला जात आहे. हा द्रवपदार्थ टेक्टोनिक प्लेट्समध्ये लुब्रिकंट म्हणून काम करतो.हे छित्र विनाशकारी भूकंपाची सुरुवात करू शकतं अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या तीव्र भूकंपामुळे अमेरिकेच्या वायव्येकडील शहरं नष्ट होतील. उष्ण द्रव पदार्ध बाहेर पडत असलेलं छिद्र ओरेगॉनच्या किनार्यापासून ५० मैल अंतरावर आहे, जे कॅस्केडिया सबडक्शन झोन म्हणून ओळखलं जातं. या छित्रामुळे तब्बल ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंक येऊ शकतो, अशी भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
SD Social Media
9850 60 3590