हार्दिक पांड्याची एक चूक आणि आयपीएलने ठोठावला लाखोंचा दंड, मॅच जिंकल्यानंतर गुजरातला मोठा धक्का
आयपीएल 2023 ही स्पर्धा दिवसेंदिवस रोमांचक होऊ लागली आहे. काल पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पारपडलेल्या आयपीएलच्या 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. परंतु हा सामना जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएलकडून दंड ठोठावण्यात आला आहे.
मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना पारपडला. शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सचा 1 धावांनी पराभव झाला तर गुजरातने आयपीएल 2023 मधील त्यांचा चौथा सामना जिंकला. परंतु या सामन्यात गुजरात टायटन्सने स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे आयपीएलच्या आचारसंहितेनुसार कर्णधार हार्दिक पांड्या वर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
माफिया अतिक अहमदच्या मुलाचं पुणे कनेक्शन
उत्तरप्रदेशमधील प्रयागराजचा माफिया डॉन आणि माजी खासदार अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा गुरुवारी यूपी पोलिसांच्या एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. झाशीतील या चकमकीत असदसोबत आणखी एक कुख्यात शूटर गुलामही मारला गेला. पण यानंतर आता अतिक अहमदचं पुणे कनेक्शन समोर आले आहे.एकेकाळी पंडित नेहरू ज्या लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते, त्या मतदारसंघातून आपल्या दहशतीच्या जोरावर आतिक अहमद निवडून आला होता. त्याने उत्तरप्रदेशमध्ये 100 पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. त्यानंतर राजकारणाची झालर ओढून तो स्वत:ला इतकी वर्ष वाचवत राहिला. मात्र, आता त्याचाच सहकारी राज पाल याच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या उमेश पाल याची काही दिवसांपूर्वी आतिक अहमद चा मुलगा असद अहमद याने हत्या केली होती आणि तेव्हापासून तो फरार होता. यूपी एसटीएफने धडाकेबाज कारवाई करत युपीचा कुख्यात गुंड आतिक अहमद याच्या मुलाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे.
राज्याच्या राजकारणातील नवी घडामोड, प्रकाश आंबेडकर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!
राज्यात एकीकडे ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे, राज्यात बीआरसीने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. अशातच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.प्रकाश आंबेडकर हे हैदराबादमध्ये दाखल झाले असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची त्यांनी भेट घेतली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंचीच्या पुतळ्याच्या लोकार्पण काही वेळातच हैदराबाद मध्ये होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर हैदराबादमध्ये आले असले तरी के चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून महाराष्ट्रात पुढील निवडणुका समोर ठेवून या राजकीय घडामोडी सुरू आहे. ते पाहता प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्यानंतर निवडणूक आयोग राष्ट्रवादीबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीसह, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. तर दुसरीकडे आपला मात्र राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीत देण्यात आलेला बंगला काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.
“चांगली शाळा बांधून द्या ना…”, पडझड झालेली शाळा दाखवत चिमुकलीची थेट मोदींना विनंती
सामान्य नागरिक आपल्या समस्या विविध माध्यमातून सरकार दरबारी पोहोचवत असतो. सरकारकडून या समस्या कधी सोडवल्या जातात तर कधी दुर्लक्ष केल्या जातात. आता तर, सोशल मीडियासारखे अस्त्र सामान्यांच्या हाती आल्याने एक ट्विट केल्यास संबंधित यंत्रणेपर्यंत आपली समस्या पोहोचू शकतो. असाच एक प्रयोग केलाय एका जम्मूमधील एका शाळकरी मुलीनं. तिने आपल्या शाळेची झालेली पडझड एका व्हिडीओच्या माध्यमातून शूट केली आणि थेट मोदींनाच विनंती केली. “आम्हाला चांगली शाळा बांधून द्या. येथे बसून आमचे कपडे खराब होतात, त्यामुळे आई ओरडते”, अशी विनंती या मुलीने व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून जवळपास २ मिलिअन्सपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
भारताच्या १२ हजार वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सचा डोळा, केंद्राकडून अलर्ट जारी
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्यारित असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (१४ सी) ने गुरुवारी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतील सरकारांना एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. इंडोनेशियातील काही हॅकर ग्रुप भारतातील जवळपास १२ हजार सरकारी वेबसाईट्सवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर तांत्रिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मनीकंट्रोलने यांसदर्भातील वृत्त दिले आहे.राज्य आणि केंद्र सरकारची अनेक संकेतस्थळे हॅकर्सकडून लक्ष्य करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही संकेतस्थळावर हल्ला होणार नाही यासाठी दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे.
करोनामुळे देशभरात एका दिवसांत २० मृत्यू, नव्या रुग्णांचा आकडाही ११ हजार पार
करोना प्रतिबंधक उपाय, लसीकरण यामुळे भारताने करोना संसर्गावर आळा घातला होता. मात्र, आता पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात असल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच, गेल्या २४ तासांत देशभरात नव्या ११ हजार १०९ करोना रुग्णांची वाढ झाली आहे.गेल्या २४ तासांत ११ हजार १०९ करोना रुग्णांची वाढ झाल्याने आता एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ६२२ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे काल दिवसभरात देशात २० मृतांची नोंद करण्यात आली आहे.
१८ हजार गायींचा आगीत होरपळून मृत्यू, टेक्सासधील स्फोटामुळे घडली घटना
अमेरिकेत पश्चिम टेक्सासमध्ये एका डेअरी फार्ममध्ये झालेल्या स्फोटामुळे जवळपास १८ हजार गायींचा मृत्यू झाला आहे. सोमवारी टेक्सासच्या डिमिटमध्ये साऊथ फोर्क डेअरी फार्ममध्ये मोठा स्फोट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत १८ हजार गायी होरपळून मृत पावल्या. हा स्फोट इतका भयंकर होता की जवळपास तासभर डेअरी फार्मवर आगीच्या ज्वाळा आणि काळाकुट्ट धूर पसरला होत्या. दरम्यान, या स्फोटामागेच कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडिया टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका प्रकरण : राहुल गांधी यांना दिलासा
राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल तक्रारीची सुनावणी १२ जूनपर्यंत न घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे गिरगाव न्यायालयात हजर राहावे लागण्यापासून राहुल यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.
रॉकी पुन्हा परतणार? अखेर KGF 3 बद्दल मोठी बातमी समोर
KGF चित्रपटात रॉकी भाई ही भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यशाने साकारली आहे. त्याचं संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे.KGF या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले तसेच बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने तुफान कमाई केली.गेल्या वर्षी याच दिवशी या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. आता आज या सिनेमाच्या तिसऱ्या भागाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.चित्रपटाला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात पुढच्या भागाविषयी मोठी अपडेट दिली आहे.आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रॉकी परतणार का, KGF: Chapter 3 मध्ये नक्की काय दाखवलं जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आता चाहत्यांना आहे.काही रिपोर्ट्सनुसार KGF 3 चे शूटिंग 2025 मध्ये सुरू होईल. यशचा हा 19 वा चित्रपट असेल.
SD Social Media
9850 60 3590