अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी ते अनुयायांची गर्दी
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (१६ एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्वास सुरू असेपर्यंच हे काम असंच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री, आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. हा पुरस्कार वितरण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकांचा जनसमुदाय खारघरच्या मैदानात दाखल झाला होता.दरम्यान, आप्पासाहेबांनी पुरस्कारासह मिळालेली २५ लाख रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केली आहे. या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड ही सरकारने नियुक्त केलेल्या समितीद्वारे केली जाते. या पुरस्कारात २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं.
अजितदादांचं गणित बरोबर, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र आता अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकार स्थिर राहील असा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी 16 आमदार अपात्र जरी झाले तरी सत्ताधारी पक्षाकडे कसं बहुमत राहिल याचं गणितच मांडलं आहे.
’15 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात 2 बॉम्बस्फोट..’ प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 15 दिवसानंतर महाराष्ट्रच्या राजकारण मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त प्रकाश आंबेडकर पुण्यात आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
सूर्यकुमार यादव बॅक इन फॉर्म, होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय
आयपीएल 2023 मध्ये आज 22 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राउंडवर कोलकाताचा पराभव केला आहे. मुंबईने विकेट्स 5 विकेट्स आणि रन्स राखून या सामन्यात विजय मिळवला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पारपडला. यासामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये केकेआरचा खेळाडू जगदीशनची विकेट पडली. त्यानंतर लागोपाठ केकेआरचे फलंदाज स्वस्तात बाद होत असताना व्यंकटेश अय्यरने मैदानात जम बसवून शतकीय कामगिरी केली.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांचं नाराजीनाट्य?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे नाराजी नाट्य समोर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांचा समावेश नाही. अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील मात्र मुंबईबाहेर होते.
अर्जुन आणि सचिन तेंडुलकर या बाप लेकाच्या जोडीने आयपीएल मध्ये रचला इतिहास
मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर आयपीएल 2023 च्या 22 व्या सामना केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत मुंबईने अर्जुन तेंडुलकरला प्लेयिंग 11 मध्ये संधी दिली.तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अर्जुन तेंडुलकरला आयपीएल मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. अष्टपैलू खेळाडू असलेल्या अर्जुनने मुंबईकडून गोलंदाजी करताना 2 ओव्हरमध्ये केकेआरला केवळ 17 धावा दिल्या.मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा 2008 ते 2011 या दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम पहिल्यांदा फायनल खेळली.सचिन तेंडुलकरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 78 सामने खेळून त्यात तब्बल 2334 धावा केलया. यादरम्यान त्याने 13 अर्धशतक आणि 1 शतक ठोकले.
इटलीच्या समुद्रात सापडलं भारतीय प्राचीन मंदिर, ‘या’ रहस्यमयी मंदिराचं गुढ अनुत्तरीत
इतिहासात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्याबद्दल आपल्याला ठावूक देखील नाही किंवा त्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टी जेव्हा लोकांसमोर नव्याने येते, तेव्हा लोकांना धक्का बसतो. एवढंच काय तर अनेक अशा रहस्यमयी गोष्टी लोकांनी मिळाल्या आहेत, ज्याबद्दल शास्र्ज्ञांना देखील माहिती नाही.
हल्लीच दक्षिण इटलीतील पोझुओली बंदराजवळ एका अतिशय प्राचीन मंदिराचे अवशेष पाण्याखाली सापडले आहेत. या मंदिराचे अवशेष पाहून प्रत्येकजण थक्क होत आहेत.
या मंदिराच्या काही भागांच्या तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, येथे सापडलेल्या वस्तू आणि मंदिराचे अवशेष हे नबताई संस्कृतीशी संबंधित असलेल्या मंदिराचे आहेत.’हेरिटेज डेली’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नबतायन देवतेची दसऱ्याला पूजा केली जाते. नबातियन संस्कृतीत पर्वतांची देवता देखील म्हटले जाते. मंदिराच्या अवशेषांसह, संशोधकांना दोन सुंदर प्राचीन रोमन संगमरवरी वेदिया देखील सापडल्या आहेत.
अरविंद केजरीवालांची सीबीआय चौकशी सुरूच!
मद्यविक्री धोरण गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू केली आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया याप्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. आता अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी सुरू केल्याने आपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशभर विविध ठिकाणी या चौकशीविरोधात कार्यकर्त्यांकडून आंदोलने केली जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्याकरता आम आदमी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. मनीष सिसोदियांप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांनाही अटक होऊ शकते, अशी भीती आपच्या नेत्यांनी वर्तवली आहे.
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाचं मोठं पाऊल, लवकरच जारी करणार मार्गदर्शक तत्त्वे
कुख्यात गँगस्टर अतिक आणि अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये काल (१५ एप्रिल) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माध्यम प्रतिनिधींच्या घोळक्यात पत्रकार असल्याचे भासवत या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला केला. या प्रकारामुळे पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये याकरता केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लवकरच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे आणि मानक कार्यप्रणाली जारी करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे
६०० कोटी बजेट असलेल्या चित्रपटातून रणवीर सिंगची एग्झिट
रणवीर सिंग हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. त्याच्या कामाचं नेहमीच प्रेक्षकांकडून कौतुक होत असतं. याचबरोबर त्याच्या दिलखुला स्वभावामुळेही तो नेहमीच चर्चेत असतो. आतापर्यंत त्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या दिले. पण आता बॉलीवूडमधील एका बिग बजेट चित्रपटातून त्याला काढता पाय घ्यावा लागला आहे.‘द इंमॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटाची गेले अनेक महिने प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका करण्यासाठी सुरुवातीला विकी कौशलला कास्ट करण्यात आलं होतं. पण काही महिन्यांपूर्वी काही कारणाने तो या चित्रपटातून बाहेर पडला. तर यानंतर त्याच्या जागी रणवीर सिंगला प्रमुख भूमिकेसाठी निवडण्यात आलं. मात्र आता त्यालाही हा चित्रपट गमवावा लागला आहे.
SD Social Media
9850 60 3590