पंतप्रधान मोदी यांनी विचारसरणीत बदल केला पाहिजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:च्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या फॅसिस्ट धाटणीच्या राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक वेगळे केले. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि एक मधला मार्ग निवडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत:मध्ये बदल घडवले. पंतप्रधान मोदी यांनीही तसचं काहीसं केलं पाहिजे, असे रामचंद्र गुहा यांनी सांगितले.

‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. यावेळी मुलाखतकार करण थापर यांनी पंतप्रधान मोदी बदलतील का?, असा प्रश्न गुहा यांना विचारला. यावर गुहा यांनी, ‘मोदी यांचे व्यक्तिमत्व त्यांना तसे करू देईल का’, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.

देशातील कोरोना परिस्थितीच्या चुकीच्या हाताळणीसाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व हे प्रमुख कारण जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी यांनी केवळ फायद्याचा विचार करुन मंत्रिमंडळ तयार केले. सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेतही स्वत:च्या मर्जीतील लोकांना स्थान दिले. तर प्रशासनात होयबा अधिकारी आणि नोकरशाहाच आपल्या सभोवताली राहतील, याची त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे आताच्या परिस्थितीलाही मोदींचे नेतृत्त्वच जबाबदारी आहे, अशी टीका रामचंद्र गुहा यांनी केली.

व्यक्ती कालानुरूप बदलू शकतात, याचे रामचंद्र गुहा यांनी उद्धव ठाकरे यांचे उदाहरण दिले. उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. फॅसिस्ट विचारसणीत वाढलेले उद्धव अधिक मनमोकळेपणाने विचार करणारे आहेत. एखाद्या व्यक्तीला पंथाचा दर्जा मिळतो, अशा वातावरणामध्ये एका मोठ्या व्यक्तीसोबत उद्धव ठाकरेंनी आयुष्यातील बराच काळ घालवला.

पण उद्धव ठाकरे आता बदलले असून वडिलांच्या विचारसणीप्रमाणे न चालता ते राजकीय मार्गावर समतोल राखत चालण्याचा आणि मुख्य प्रवाहातील राजकारणाचा विचार करताना दिसत आहेत. त्यांनी निश्चय करुन आणि यशस्वीपणे हा बदल घडवून आणल्याकचे रामचंद्र गुहा यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.