केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी एक नवी योजना सुरु केली आहे. पंतप्रधान रोजगार सृजन असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर पंतप्रधान रोजगार सृजन योजनेचा लाभ घेऊ शकता.
वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कर्ज मिळेल. सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थानाही या योजनेतंर्गत कर्ज मिळू शकते.
मात्र, तुमचा व्यवसाय हा पूर्णपणे नवा असला पाहिजे, ही पूर्वअट आहे. तुम्ही अगोदरपासूनच एखादा व्यवसाय करत असाल आणि तो तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतून कर्ज मिळणार नाही. तसेच पूर्वीपासून सरकारी अनुदांनाचा लाभार्थी असलेल्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
पंतप्रधान रोजगार सृजन योजनेतंर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 टक्के अनुदान मिळेल. तर शहरी भागातील तरुणांना 15 टक्के अनुदान मिळेल. व्यवसायात 10 टक्के पैसे तुमचे असणे गरजेचे आहे.
पंतप्रधान रोजगार सृजन योजनेचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेच्या PMEGP संकेतस्थळावर जावे लागेल. याठिकाणी PMEGP हा पर्याय निवडावा. त्यानंतर PMEGP E -Portal हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन Online Application Form of Individual मिळवता येईल. या अर्जात तुम्हाला सर्व तपशील भरावा लागेल.