प्रसिद्ध उद्योजक राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्टस लिमिटेड समूहातील DMart कंपनीला मोठा फायदा झाला आहे. जून तिमाहीत कंपनीच्या नफ्याचा आकडा कित्येकपटींनी वाढला आहे. या तिमाहीत कंपनीला 115.13 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी डी मार्टला 50 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. याचा अर्थ यंदा कंपनीच्या नफ्यात 132 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कंपनीकडून शनिवारी तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने 3,833.23 कोटी रुपये कमावले होते. मात्र, यंदा हा आकडा 5,031.75 कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
सुपरमार्टसच्या समभागाचा भाव 1.96 टक्क्यांनी वाढून 3,425 रुपयांवर पोहोचली. या समभागाच्या किंमतीने सध्या सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. एव्हेन्यू सुपरमार्टसचे एकूण भांडवली मूल्य 2.18 लाख कोटी असून ही देशातील 18 वी मोठी कंपनी आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणि जनता दोघेही उद्ध्वस्त झालेत. संकटाच्या या काळात बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचार्यांच्या बचावासाठी पुढे आल्यात. कर्मचार्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्यात, जेणेकरून त्यांना मदत करता यावी. यासंदर्भात ग्लोबल टेक दिग्गज मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्यांना मोठा बोनस जाहीर केलाय. द वर्जच्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्यांना 1500-1500 डॉलर म्हणजेच एक लाखाहून अधिक रुपयांचा स्वतंत्र बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. मायक्रोसॉफ्टच्या मुख्य पीपल्स ऑफिसरने (CPO) 8 जुलै रोजी हा बोनस जाहीर केला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बोनस दिला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या जगातील प्रत्येक कर्मचाऱ्याला याचा फायदा होईल.