आता शाकाहारी लोकांसाठीही वनस्पती आधारित चिकन बाजरात

बियॉन्ड मीट्स या कंपनीनेने शाकाहारी चिकन विकायला सुरुवात केली आहे. आता तुम्ही म्हणाल शाकाहारी चिकन कसं काय? हे चिकन वनस्पती-आधारित असते. म्हणून त्याला शाकाहारी चिकन असेही म्हटले जाते. या चिकनची चर्चा इंटरनेटवर होत आहे. बियॉन्ड मीट्सने शाकाहारी चिकनचे वेगवेगळे पदार्थही विकायला सुरुवात केली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्ट नुसार २०१९ नंतरचं बियोंड मीट्सचं हे पाहिलंच चिकनचं उत्पादन आहे. अहवालानुसार कंपनीने आधी वनस्पती-आधारित चिकन पट्ट्या बनवण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न काही कारणामुळे बंद करावा लागला.

बियॉन्ड मीट्सच्या वेबसाइटवर नमूद केल्यानुसार त्यांच्या उत्पादनाची ‘प्रथिने’ वाटाणे, मूग, वाल आणि ब्राऊन राईस यापासून मिळतात. या वनस्पती-आधारित चिकनमधील ‘चरबी’ कोकोआ बटर, नारळ तेल आणि एक्स्पेलर-प्रेसिड कॅनोला ऑइल मधून मिळते. त्यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ‘मिनरल्स’साठी कॅल्शियम, लोह, मीठ आणि पोटॅशियम क्लोराईड यांचा वापर करण्यात आला आहे. तर चव आणि रंगासाठी बीटचा रस आणि सफरचंदाचा अर्क वापरला आहे. ‘कार्बोहायड्रेट्स’साठी कंपनीने बटाटा स्टार्च आणि मिथाइल सेल्युलोजचा वापर केला आहे.

सीएनबीसीच्या अहवालानुसार अमेरिकेतील ४०० रेस्टॉरंट्समध्ये हे चिकन विकले गेले आहे. त्यांच्या वेबसाइटनुसार, बियॉन्ड मीट्समध्ये वनस्पती-आधारित मीटबॉल, बर्गर पॅटीस आणि सॉसेज देखील आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की बियॉन्ड मीटने हे ‘स्केलेबल बिझिनेस मॉडेल’ असल्याचा दावा केला आहे. अधिकाधिक रेस्टॉरंट्सने त्यांच्या या उत्पादनाची विक्री सुरू केल्यामुळे उत्पादनाची किंमत कमी होत जाईल असेही म्हटले आहे.

अलिकडच्या काळात झालेल्या संशोधनानुसार लाल मांस खाण्यामुळे हृदयाचे आजार, कॅन्सर आणि डायबेटिससारखे आजार होत आहेत. प्रक्रिया केलेले मांस विशेषतः मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे आढळले आहे. वनस्पती-आधारित शाकाहारी चिकनचा आरोग्यास फायदा होत आहे. ब्लड प्रेशर, कॅन्सर डायबेटिस आणि हृदयाचे आजार कमी करण्यास हे वनस्पती-आधारित शाकाहारी मांस फायदेशीर ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.