घराची किंमत फक्त १००० कोटी

करोना काळात इतर क्षेत्रांप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. मात्र आता लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना हे क्षेत्रही पुन्हा एकदा उभारी घेत आहे. दरम्यान मुंबईतील श्रीमंताचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे. मलबार हिलमध्ये तब्बल १००० कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे. डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे घर विकत घेतलं आहे. नारायण दाभोळकर मार्गावरील मधू कुंज या इमारतीत हे घर आहे.

३१ मार्चला हा व्यवहार झाला. राधाकृष्ण दमानी यांनी मलबार हिलमध्ये १००० कोटींना विकत घेतलेल्या या घरासाठी ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. बाजारभावानुसार या घराची किंमत ७२४ कोटी रुपये आहे. ५७५२.२२ चौरस फुटांच्या घराचा हा व्यवहार सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे.
राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत. भारतातल्या अनेक मोठ्या तसंच लहान शहरांमध्ये ‘डी-मार्ट’ च्या शाखा आहेत. ‘डी-मार्ट’मध्ये रोजच्या वापरातल्या किराणा मालासारख्या अनेक गोष्टी मिळतात. भारतातल्या किराणा मालाच्या अनेक यशस्वी चेन्सपैकी डी-मार्ट ही एक चेन आहे.

भारतातील श्रीमंतांच्या यादीत राधाकृष्ण दमानी यांचा समावेश आहे. नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट अशी स्टाईल असणाऱ्या राधाकृष्ण दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. राधाकृष्ण दमानी हे प्रसारमाध्यमं तसंच सोशल मीडिया या सर्व गोष्टींपासून दूरच असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.